Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकNashik Political : सुनीता चारोस्करांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांच्या सभेला हजारोंचा जनसमुदाय

Nashik Political : सुनीता चारोस्करांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांच्या सभेला हजारोंचा जनसमुदाय

दिंडोरी | Dindori

एकदा आम्हाला सोडून गोव्याला पळाले, आम्ही महाराष्ट्राभर शोधत होतो परंतु झिरवाळ गोव्यात एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सिनेमा बघत बसलेले आढळले. तिकडून आल्यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही, म्हणून असे आश्वासन आम्हाला दिले. भोळा आदिवासी माणूस म्हणून आम्ही विश्वास ठेवला परंतू पुन्हा तीच चूक करुन आपल्याशी फसविगिरी केली. अशा दोनदा पळून जाणाऱ्या झिरवाळांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर ह्या हजारो पटीने चांगल्या असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : मतदारसंघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

दिंडोरी येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनीताताई चारोस्कर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली हजारोंच्या उपस्थितीत सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, मोदी सरकारने पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी लोकसभेत ४०० चा आकडा पार करण्याचा मनसुबा रचला होता. परंतू लोकांनी त्यांचा मनसुबा लक्षात घेवून त्यांना त्यांची जागा दाखवली. लोकशाहीवर आलेले संकट थांबवण्यासाठी इंडीया आघाडीची स्थापना झाली आणि नाशिक जिल्ह्याने सर्व खासदारांना भरघोस मतांनी निवडून देत एक इतिहास रचला. त्यामुळे सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे स्वागत, परंतू आजही लहान मुली तसेच महिलांवर अत्याचार होतात. शेकडो महिला आजही गायब झाल्या असून त्यांचा शोध लागत नाही. त्यामुळे लाडकी बहिणी म्हणून चालणार नाही तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सरकारला घ्यावी लागेल. परंतू हे सरकार महिलांना सुरक्षा देण्यासाठी अपयशी ठरले असल्याने या सरकारला बदलण्याची वेळ आता आली असल्याचे शरदचंद्र पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

त्याचबरोबर विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे शेती उत्तम करतात, त्यामुळे त्यासाठी त्यांना आता मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे सांगत दोनदा फसवणूक (Fraud) करणारे झिरवाळ विश्वासास पात्र ठरु शकत नाही, उद्या सत्तेसाठी काय करतील, त्याचा भरोसा नाही, यापेक्षा उच्चशिक्षित सुनीताताई चारोस्कर हजार पट्टीने चांगल्या आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेद्वार म्हणून त्यांची निवड केली आहे. या आदिवासी भगिनीला श्रीराम शेटे व आपल्या सारख्या हजारो मतदारांचा (Voting) पाठिंबा मिळत असल्याने आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. त्यामुळे महाराष्ट्राची (Maharashtra) सत्ता उलटून टाकण्यासाठी सुनीताताईंना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन शरदचंद्र पवार यांनी केले. यावेळी नितेश कराळे, श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, जयंत दिंडे, दत्तात्रय पाटील, संगीता पाटील, कृष्णा घुले आदींनी आपल्या मनोगतातून महायुती सरकारच्या (Mahayuti Government) धोरणांवर टिकास्त्र सोडले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, महिला, वयोवृध्द, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या