Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : 'प्रोटेक्शन मनी'च्या कारणातून गोळीबार; तिघांना चार दिवसांची कोठडी, जखमीची...

Nashik Crime : ‘प्रोटेक्शन मनी’च्या कारणातून गोळीबार; तिघांना चार दिवसांची कोठडी, जखमीची प्रकृती धोक्याबाहेर

इतरांच्या शोधार्थ तीन पथके रवाना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘प्रोटेक्शन मनी’च्या कारणातून सातपूरच्या (Satpur) नाईस संकुलातील बिअर बारमध्ये (Beer Bar) गोळीबार करुन पसार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या व मुख्य संशयित भूषण लोंढेसह (Bhushan Londhe) साथीदारांच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयाने (Court) चार दिवसांची (दि. १०) पोलीस कोठडी सुनावली असून जखमी ग्राहक वरुण विजय तिवारी (वय २३, रा. सिडको) याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शस्त्रक्रिया करुन त्याच्या पायात अडकलेली काडतुस बाहेर काढण्यात आली आहे.

- Advertisement -

शुभम पाटील उर्फ भुरा, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे अशी अटकेतील संशयितांची (Suspected) नावे असून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. दहशत व भितीपोटी कुणीही तक्रार करण्यास धजावत नसल्याने अखेर सातपूर पोलिसांनी (Satpur Police) सुमोटो फिर्याद दाखल करुन गंभीर घटनेचा उलगडा केला होता. दरम्यान, या कारवाईमुळे सातपूरमधील ठराविक ‘राजकीय कनेक्शन’ ‘प्रोटेक्शन मनी’ (खंडणी) असे अनेक मुद्दे या उघड झाले आहेत.

नाईस संकुलातील ‘हॉटेल और बार’ हा मोहित नारंग यांच्या मालकीचा असून एप्रिलपासून बिपीन पटेल व संजय शर्मा हे चालवित आहेत. तेव्हापासून भूषण प्रकाश लोंढे याने तेथे जाऊन भांडणे केली. पटेल व शर्मा यांना ‘येथे माझी माणसे ठेऊन हॉटेलची सुरक्षा (Hotel Security) पुरवून भांडण मिटवतो. त्या बदल्यात दहा टक्के भागीदारी रक्कम द्यावी लागेल’, असा खंडणीसाठी दम भरला.

मागील दोन महिन्यांपासून बारचालकांनी लोंढेला खंडणी (Ransom) देण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून लोंढेसह त्याचे सर्व साथीदार हॉटेलात यायचे, तेव्हा वाद न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या घटनेने सातपूर भागात विविध चर्चा झडत असून आता पोलीस भूषण प्रकाश लोंढे, प्रिन्स सिंग, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत संजय चाळगेसह अन्य पाच अशा अकरा संशयितांचा कसोशीने शोध घेत आहेत.

प्रिन्स, लोंढे, चाळगे सराईत

संशयित भूषण लोंढेवर यापूर्वी गोळीबार, हल्ल्याचे प्रयत्न, बेकायदेशीर मिरवणुका काढल्यासंबंधी गुन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी आव्हाड-गवळे दुहेरी हत्याकाडांत भूषण, सनी, प्रिन्स हे निर्दोषमुक्त झाले होते. मात्र, सात वर्षे ते कारागृहात होते. यासह वेदांतही सराईत असून, त्याच्यावर दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, विनयभंगाचे ९ पेक्षा जास्त गुन्हे आहेत. त्याला तडीपार आणि नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध केले होते. सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरचा तो कट्टर साथीदार आहे. तर, इतर संशयितांवरही किरकोळ व गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : अज्ञात वाहनाची बुलेटला धडक; माळीचिंचोराचे तिघे जागीच ठार

0
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पुनतगाव फाटा येथे बुलेटला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या...