Saturday, April 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : मुलीस लग्नाची मागणी घातल्याचा आला राग; दोघा भावंडांनी एकावर...

Nashik Crime : मुलीस लग्नाची मागणी घातल्याचा आला राग; दोघा भावंडांनी एकावर धारदार शस्त्राने केला वार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुलीस लग्नाची मागणी घातल्याच्या रागातून दोघा भावांनी (Two Borhers) एकावर धारदार शस्राने वार करुन जखमी केल्याची घटना जाधव संकुल भागात घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अजय संपत दोबाडे (रा.उपेंद्रनगर अंबड) यााने फिर्याद दिली आहे. अजय याचा भाऊ समीर दोबाडे (रा.गिरणारे ता.जि.नाशिक) याने एका मुलीची छेड काढत लग्नाची मागणी केली होती. या वादातून सोहम भंडारी व चेतन भंडारी (रा.दोघे महादेववाडी,सातपूर) यांनी समीरला रविवारी रात्री जाधव संकुल भागात एकटा गाठून हल्ला केला.

यानंतर त्यांनी शिवीगाळ करीत समीरला लाथबुक्यांनी मारहाण (Beating) करीत धारदार शस्त्राने वार केला. यावेळी अजय दोबाडे हा आपल्या भावाच्या मदतीला धावून गेला असता संशयितांनी त्यालाही मारहाण करीत डोळ्यास व डाव्या हातावर इजा केली. या घटनेत अजय आणि समीर गंभीर जखमी झाले असून, भंडारी बंधूंना सातपूर पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रदिप पवार करीत आहेत.

ताज्या बातम्या

हल्ला

इराणचा अमेरिकेवर गेल्या २४ तासांत जोरदार हल्ला; दोन लढाऊ विमानं पाडली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiगेल्या ३६ दिवसांपासून आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या २४ तासांमध्ये जबरदस्त उलथापालथ दिसून आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये...