Sunday, April 5, 2026
Homeक्राईमNashik Crime : "माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर…"; भोंदूगिरीच्या नावाखाली महिलेवर तब्बल...

Nashik Crime : “माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर…”; भोंदूगिरीच्या नावाखाली महिलेवर तब्बल १४ वर्षे अत्याचार

कुटुंबाची ५० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

पाथर्डी गावातील (Pathardi Gaon) गैळाणे रोड परिसरात २०१० ते २०२५ दरम्यान एका महिलेची (Woman) भोंदूगिरीच्या नावाखाली फसवणूक (Fraud) करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गणेश जयराम जगताप (रा. धारणगाव खडक, कामाख्या मंदिर, निफाड) याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी सपोआ सचिन बारी (अंबड विभाग) यांच्याकडे आहे.

- Advertisement -

याबाबत पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून, संशयित आरोपीला भोंदूगिरी आणि तांत्रिक विधी करण्यासाठी मातंग समाजातील महिलेची गरज असल्याचे सांगत, त्याने फिर्यादीच्या पतीला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर व्यसन मुक्तीच्या नावाखाली फिर्यादीशी जवळीक साधली. यानंतर संशयित आरोपीने फिर्यादीला, तू मला खूप आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो, असे सांगितले.

यानंतर त्याने एक पुस्तक दाखवले ज्यात फिर्यादी, तिचा पती आणि मुलांची नावे लिहिलेली होती.पुस्तक दाखवून संशयित आरोपीने धमकी दिली की, ‘माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर या नावांपैकी एकाचा बळी जाईल. या
धमकीच्या भीतीने संशयित आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अनेक वेळा जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. तसेच फिर्यादी आणि तिच्या कुटुंबाकडून ५० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, हा गुन्हा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी नोंदवण्यात आला असून, संशयित आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासण्याचे काम सुरू करत पोलिसांनी (Police) पुढील तपास चालू केला आहे. तसेच या प्रकरणी भादंवि कलम 64(1), 316(2), 318(4) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम 3(1) (W) (i), 3(1)(W)(ii), 3(2), 3(V) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon नाशिक महापालिकेत क्लार्क, शिपाई व सहाय्यक आयुक्त तसेच शासनाच्या अन्य विभागात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून बेरोजगारांची तब्बल ५३ लाख ५०...