Sunday, May 3, 2026
Homeक्राईमNashik Yeola Crime : अवैधरित्या अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे बाळगून विक्री करणारे जेरबंद

Nashik Yeola Crime : अवैधरित्या अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे बाळगून विक्री करणारे जेरबंद

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरात अवैधरित्या अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे बाळगून विक्री करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी (City Police) जेरबंद केले आहे. तर एक संशयित फरार झाला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका (Election) शांततेत पार पडाव्या यासाठी अवैद्य शस्त्रसाठा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सुचित केलेले होते.

- Advertisement -

तर दिपावली (Dipawali) सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगार वाँच पेट्रोलिंग फिरत असतांना सोमवार (दि.२०) रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतिष देवराम मोरे, पोलीस शिपाई जनार्धन मधुकर दळवी आणि ११२ डायल ड्युटीचे पोलीस शिपाई नवनाथ बन्सींलाल गायकवाड यांना बातमीदारामार्फत दोन इसम अग्निशस्त्र बाळगून कोर्टाच्या परिसरात फिरत आहेत, अशी माहिती मिळाली.

यानंतर दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास देवीखुंटाकडून कोर्टाच्या (Court) दिशेने एक सफेद रंगाची स्कूटर येताना दिसली. त्या स्कूटरला नंबरप्लेट नव्हती. तसेच त्याच्यावर समोर रायफलचे चित्र चिकटविलेले दिसले. त्यावेळी स्कूटरवरील इमरान मुन्नवर पठाण, (वय २५) रा. शाह कॉलनी, फैजान ए मदिना मशिद जवळ, येवला, जि. नाशिक, बाल अपचारी (वय १६) रा. मिल्लतनगर, आला हजरत मशिद पाठीमागे, येवला, जि. नाशिक यांचे ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, आणि एक स्कुटर असा १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीच्या आधारे कामिल शकील शेख (वय २५) रा. घर नंबर ११९४, कहार गल्ली,येवला याच्याकडून एक गावठी बनावटीचे २० हजार रुपये किंमतीचे पिस्तूल हस्तगत केले. सदरची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे मस्तान उर्फ अरबाज शेख,रा. मोमीनपुरा, ता. येवला, जि. नाशिक यांनी विक्रीसाठी पुरविली होती अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

दरम्यान, यातील मस्तान उर्फ अरबाज शेख हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर शहर पोलीस ठाणे या प्रकरणी भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडखे, सोपान शिंदे, पोलीस नाईक सतिष मोरे, पोलीस शिपाई जनार्धन दळवी, नवनाथ गायकवाड, दिपक मुंढे, चालक ओमकार तुंगार यांनी केली.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...