येवला | प्रतिनिधी | Yeola
येवला तालुका पोलिसांनी (Yeola Taluka Police) केलेल्या धडक कारवाईत एक गावठी कट्टा व तीन काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिलेल्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधु व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
येवला तालुक्याच्या (Yeola Taluka) हद्दीमध्ये चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढल्याने त्याला प्रतिबंध करण्याकरिता पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, सचिन वैरागर, सागर बनकर, पंकज शिंदे, दिपक जगताप, चालक राजु डुबे हे खाजगी वाहनाने पाटोदा परिसरात पेट्रेलिंग करीत असतांना पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना ऋषिकेश मोतीराम माळी (वय २४ ) रा.आंबेगाव ता. येवला जि. नाशिक , सोपान निवृत्ती जगताप (वय ३२) रा. मरळगोई ता.निफाड जि. नाशिक हे एक गावठी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानंतर येवला तालुका पोलीस ठाणे व लासलगाव पोलीस ठाणेकडील (Lasalgaon Police Station) अधिकारी व अंमलदार यांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तीन काडतुस व एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी सोपान निवृत्ती जगताप रा. मरळगोई ता. निफाड याच्याविरुद्ध लासलगाव, नाशिक, जळगाव शहर येथे विविध गुन्हे दाखल आहे.
दरम्यान, तालुका पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील (Investigation Team) हर्षवर्धन बहीर, सचिन वैरागर,सागर बनकर, पंकज शिंदे, दिपक जगताप, राजु डुबे लासलगाव पोलीस ठाण्याचे भास्कर शिंदे, सुजय बारगळ, संदीप डगळे यांनी ही कामगिरी बजावली.





