Friday, June 19, 2026
Homeक्राईमNashik Crime : शेततळ्यात पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

Nashik Crime : शेततळ्यात पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील आडगाव रेपाळ (Aadgaon Repala) येथील तरुण शेतकऱ्याचा (Farmer) शेततळ्यात पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.    

- Advertisement -

याबाबत योगेश घमाजी महाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा चुलत भाऊ गणेश वाळुबा महाले (वय ४६) रा. आडगाव रेपाळ हा (दि.१९ मार्च) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण करुन घरातून निघुन गेला. तो घरी पुन्हा आला नाही म्हणून दि.२० मार्च रोजी पहाटे गावात तसेच मळ्यात शोध घेतला असता त्याच्या पायातील चप्पल आडगाव रेपाळ शिवारातील शेत गट नं २४ मधील शेततळ्यात दिसून आली.

दरम्यान, यानंतर सर्व नातेवाईकांनी शेततळ्यामध्ये उतरुन बघितले असता गणेश महाले हा त्यामधील पाण्यात मिळून आला. त्यानंतर पुढील उचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले आहे. याप्रकरणी गणेश महाले यांच्या फिर्यादीवरून येवला ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास ए.एस.आय सुनील पवार करीत आहेत.

ताज्या बातम्या

आदित्य

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना...