Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू

नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू

शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी खा. भास्कर भगरे यांचे दिल्लीकडे प्रस्थान

- Advertisement -

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

नाशिककरांसाठी महत्त्वाची आणि अभिमानास्पद बातमी! आजपासून (२६ ऑक्टोबर २०२५) नाशिक ते दिल्ली दरम्यानची रात्रीची विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवेच्या नियमित सुरूवातीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी आज या नव्या विमान सेवेतून थेट दिल्लीकडे प्रस्थान केले.

खासदार भगरे यांनी सांगितले की, “नाशिक-दिल्ली विमानसेवा नियमित सुरू व्हावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. आज या प्रयत्नांना यश आले आहे. या सेवेद्वारे मी थेट दिल्लीला प्रवास करीत असून आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेणार आहे.”

या भेटीत खासदार भगरे दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या कृषी मंत्र्यांसमोर मांडणार आहेत.“असमानी आणि सुलतानी संकटाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले

, “नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्याच विमानातून मी शेतकऱ्यांसाठी दिल्लीकडे निघालो आहे, ही माझ्यासाठी शेतकरीपुत्र म्हणून सार्थ अभिमानाची बाब आहे.”.असे खासदार भगरे म्हणाले

या प्रवासात नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे आणि सह्याद्रीचे विलास आण्णा शिंदे हेही भगरे यांच्यासोबत आहेत.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन – कुंभमेळा प्राधिकरण...

0
नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी...