Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik News : विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; महावितरण कंपनीवर...

Nashik News : विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; महावितरण कंपनीवर केले गंभीर आरोप

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) मडकीजांब (Madkijamb) येथे विजेचा धक्का लागून २२ वर्षीय युवकाचा दुदैर्वी मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी विज महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, मडकीजांब येथे काल संध्याकाळी पावसामुळे ओल निर्माण झाली होती. गायकवाड वस्तीलगत घरातील वाहिनीने करंट पकडला पकडला होता. याबाबत दोन-तीन वीज ग्राहकांनी वीज कंपनीला वायरमनला कळवले होते. वीज कंपनीने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. सकाळी भूषणची आजी वीज पोलाच्या बाजूला गेली असतांना पोलामध्ये करंट उतरला होता. त्यावेळी भूषण आला व त्यालाही जमिनीतून विजेचा धक्का बसल्याने तो जागीच खाली कोसळला. त्याला दिंडोरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला नाशिक (Nashik) येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, भूषण हा चांगला होतकरु युवक होता. दिंडोरी येथील एका फायनान्स कंपनीत कामाला होता. कष्ट करुन तो कुटूंब चालावयाचा. त्याला अजून दोघे भाऊ असून, वडील मजुरीचे काम करतात तर आई आशा सेविका आहे. आज (मंगळवारी) अचानक त्याच्या मृत्यूची माहिती मडकीजांब तसेच दिंडोरी शहरात (Dindori City) पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी विज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे भूषण संतोष गायकवाडचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विज कंपनीकडे पूर्वी तक्रार करुनही या पोलाबाबत विज कंपनीने दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीनेही पत्र व्यवहार केला होता, असेही ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत नातलग ग्रामस्थ आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....