Wednesday, November 18, 2026
HomeनाशिकNashik Dindori News : करंजवण धरण परिसरात जलसंपदा, महावितरण विभागाची संयुक्त...

Nashik Dindori News : करंजवण धरण परिसरात जलसंपदा, महावितरण विभागाची संयुक्त कारवाई; नाव नसलेले स्टार्टर जप्त

ओझे | विलास ढाकणे | Oze

करंजवण धरण (Kranjwan Dam) जलाशयातून होणारा अनधिकृत पाणी (Water) उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभाग आणि महावितरण विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान संयुक्त पथकाने पाहणी करून जलाशयाकाठचे विनापरवाना व नाव नसलेले स्टार्टर जप्त करण्याची धडक कारवाई केली आहे. प्रशासनाच्या यापूर्वीच्या आवाहनानंतरही ज्या स्टार्टर पेटीवर नाव व मोबाईल नंबर लिहिलेला नव्हता, अशा आणि अनधिकृत आढळलेल्या साहित्यावर कारवाई करत पथकाने ते जप्त केले आहे.

- Advertisement -

सदर कारवाई पालखेड पाटबंधारे विभागाचे (Palkhed Irrigation Division) कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपविभागीय अभियंता निलेश वन्नेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजवन धरण शाखा अभियंता आकाश ठाकरे, महावितरणचे सहायक अभियंता मेघराज बागुल, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक धनंजय वीरकर व इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

शेतकऱ्यांना सक्त सूचना

ज्या शेतकऱ्यांकडे कायदेशीर पाणीपरवानगी आहे, त्यांनी आपल्या स्टार्टरच्या पेटीवर/बॉक्सवर मार्कर किंवा ऑइल पेंटने आपले पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर स्पष्ट दिसेल असा लिहावा. ज्यांचे स्टार्टर नाव नसलेले आढळतील किंवा मंजूर क्षमतेपेक्षा जास्त एचपीची मोटर व अनधिकृत पाणी उपसा सुरू राहील, त्यांच्यावर साहित्य जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा संयुक्त पथकातर्फे देण्यात आला आहे. पाणी उपसा करणाऱ्या सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा व महावितरण विभागाच्या संयुक्त तपासणी पथकाद्वारे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : कसबे वणी-नाशिक रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार,...

0
दिंडोरी | प्रतिनिधी |Dindori कसबे वणी–नाशिक रस्त्यावर (Kasbe-Vani Road) ओझरखेड धरणाच्या (Ozarkhed Dam) सांडव्याच्या पुढे हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास थार...