Wednesday, November 18, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Onion News : भारतात कांद्याची मुबलक उपलब्धता; उत्पादकता वाढल्यास उत्पादन समाधानकारक...

Nashik Onion News : भारतात कांद्याची मुबलक उपलब्धता; उत्पादकता वाढल्यास उत्पादन समाधानकारक राहणार, निर्यातीची मोठी संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशात यंदा कांद्याचे (Onion) उत्पादन 288.96 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज केंद्र सरकारने (Central Government) व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या 307.67 लाख मेट्रिक टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा सुमारे 6.08 टक्के घट अपेक्षित असली, तरी देशाची वार्षिक कांदा गरज सुमारे 210 लाख मेट्रिक टन असल्याने देशांतर्गत मागणी भागवून निर्यातीसाठीही कांदा उपलब्ध राहू शकतो, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कांदा लागवड क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली तरी अनुकूल हवामान, पाण्याची (Water) उपलब्धता, सुधारित लागवड पद्धती आणि प्रति एकर उत्पादकता वाढल्यास एकूण उत्पादन समाधानकारक राहू शकते. त्यामुळे केवळ लागवड क्षेत्रातील घट पाहून उत्पादनात मोठी घसरण होईल, असा निष्कर्ष काढू नये, असे दिघोळे यांनी स्पष्ट केले. भारताची कांदा निर्यात 2024-25 मध्ये 11.7 लाख टन होती. ती 2025-26 मध्ये वाढून 15.48 लाख टन झाली आहे.

आखाती देश, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि नेपाळसह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारतीय कांद्याला मागणी असल्याने निर्यात वाढविण्याची संधी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी दीर्घकालीन व सातत्यपूर्ण धोरण स्वीकारावे, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठा विकसित कराव्यात आणि आधुनिक साठवणूक, पॅकिंग, प्रतवारी व प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तसेच कांद्याच्या उत्पादनापासून (Production) निर्यातीपर्यंतची मूल्यसाखळी मजबूत करून शेतकऱ्यांना किमान 3,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. देशांतर्गत ग्राहकांचे हित जपत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य बाजारभाव मिळावा. यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र राष्ट्रीय कांदा निर्यात धोरण राबवावे, असे आवाहन भारत दिघोळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : कसबे वणी-नाशिक रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार,...

0
दिंडोरी | प्रतिनिधी |Dindori कसबे वणी–नाशिक रस्त्यावर (Kasbe-Vani Road) ओझरखेड धरणाच्या (Ozarkhed Dam) सांडव्याच्या पुढे हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास थार...