Friday, August 7, 2026
HomeनाशिकEarthquake Tremors News : सुरगाण्यासह कळवण, पेठ तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये...

Earthquake Tremors News : सुरगाण्यासह कळवण, पेठ तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दिल्लीचे NCS पथक नाशिकमध्ये दाखल

सुरगाणा | Surgana

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बोरगाव, सराड, घागबारी, हरणटेकडी, रोटी, वाझुळपाडा आणि शिंदे दिगरसह आसपासच्या परिसरात गुरुवारी (६ ऑगस्ट) दिवसभरात भूकंपाचे सलग पाच सौम्य धक्के (Earthquake Tremors) बसल्याने नागरिकांमध्ये (Citizen) तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसले, तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अधूनमधून धक्के बसत होते, मात्र गुरुवारी एकाच दिवशी पाच वेळा जमीन हादरल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक ग्रामस्थ बराच वेळ घराबाहेरच थांबून होते. वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे रात्रीच्या वेळी झोपणेही कठीण झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

कळवण, पेठ तालुक्यातही भूकंपाचे

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) दळवट आणि पेठ तालुक्यातील (Peth Taluka) आसरबारी परिसरात दुपारी ३:३८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. सध्या या सर्व भागांमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिल्लीचे एनसीएस पथक नाशिकमध्ये दाखल

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि त्यामागील तांत्रिक कारणांची सविस्तर तपासणी करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) दिल्ली येथील विशेष तज्ज्ञ पथक तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आहे. हे पथक बाधित भागांची पाहणी करून आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

सुरगाण्यात पाच भूकंपाचे धक्के

सकाळी ५:४१ वाजता: ३.० रिश्टर स्केल
सकाळी ७:०९ वाजता: ३.० रिश्टर स्केल
सकाळी ८:५८ वाजता: २.७ रिश्टर स्केल
दुपारी २:५६ वाजता: २.८ रिश्टर स्केल
दुपारी ३:३८ वाजता: ३.६ रिश्टर स्केल (दिवसातील सर्वाधिक तीव्रतेचा धक्का)

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ ऑगस्ट २०२६ – जनहिताच्या मुद्यांवर स्पर्धा हवी

0
भारतीय राजकारणात विचार, धोरणे आणि प्रतिवादाची भाषा हा नेहमीच लोकशाहीचा कणा राहिली आहे. राजकीय नेत्यांच्या कार्यशैलीवर, धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना...