नाशिक | Nashik
अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) मंगळवार (दि.२) रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडे सात वाजेपासून मतदान सुरु झाल्यानंतर साडे नऊपर्यंत जिल्ह्यात ९ टक्के मतदान झाले होते. यानंतर साडे अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.४३ टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर आता दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ४६.७१ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वात कमी मतदान येवला तर सर्वाधिक मतदान त्र्यंबकमध्ये झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Update : सिन्नरला मतदानाचा जोर वाढला; दुपारनंतर मतदारांची मोठी गर्दी, ज्येष्ठही सरसावले
येवल्यात दुपारी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ३७.०२ तर त्र्यंबकला ६९.७५ टक्के मतदान झाले आहे
तर पिंपळगाव बसवंत ५७.०२ टक्के, भगूर ५२.४३ टक्के, मनमाड ३९.५२ टक्के, सिन्नर ४८.०३ टक्के, इगतपुरी ४८.७३, चांदवड ५३.३९ टक्के, ओझर ४१.टक्के, नांदगाव ४०.२० टक्के आणि सटाण्यात ५५.१५ टक्के इतके मतदान झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Update : त्र्यंबकला मतदान केंद्रावर राडा; पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची, बंदोबस्त वाढवला
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७२ हजार ५४३ मतदारांपैकी दुपारी तीन वाजेपर्यंत १ लाख ७४ हजार ०१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात ८६ हजार ४७३ महिला आणि ८९ हजार ३३६ पुरुष व इतर ०४ जणांचा समावेश आहे. या मतदानातून आज २६६ नगरसेवकपदांसाठी १,०२८ तसेच ११ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे.




