Saturday, July 4, 2026
HomeनाशिकNashik FDA Raid News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम...

Nashik FDA Raid News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंचा दणका; नाशिक विभागातील ९ हॉटेल्सचे परवाने निलंबित

नाशिक | Nashik

अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नाशिक विभागाने (Nashik Divison) दोन दिवसांत २० हॉटेल व खाद्य आस्थापनांची तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ आस्थापनांवर कारवाई केली. यापैकी सात आस्थापनांचे परवाने तपासणीदरम्यान तत्काळ निलंबित करण्यात आले, तर सुधारणा नोटीसचे पालन न केल्याने आणखी दोन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली १ व २ जुलै रोजी नाशिक विभागात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट शीतकरण व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय तपासणी नसणे, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे विविध उल्लंघन आढळून आले. या कारवाईत नाशिकमधील पंचवटी, द्वारका, पेठरोड तर सिन्नर, जळगाव तसेच नंदुरबार येथील रेस्टॉरंट यांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.

याशिवाय, पूर्वी देण्यात आलेल्या सुधारणा नोटिशीतील त्रुटी निर्धारित मुदतीत दूर न केल्याने भुसावळ आणि धुळे येथील कॅन्टीनचे परवानेही निलंबित (Licenses Suspend) करण्यात आले. चार तपासणीदरम्यान आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी अथवा परवाना नसल्याचे आढळून आल्याने आवश्यक नोंदणी किंवा परवाना मिळेपर्यंत त्यांचा अन्न व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई (Action) सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud News : पदाचे आमिष दाखवून आठ लाखांची फसवणूक ;...

0
नाशिक | Nashik नेहमीच संशयास्पद कारभाराच्या आरोपांमुळे चर्चेत असणाऱ्या दिंडोरी रोडवरील (Dindori Road) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून (एमयूएचएस) फसवणुकीचा कारनामा समोर आला आहे. विद्यापीठात क्लर्क...