Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Fire News : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग; कारण अस्पष्ट

Nashik Fire News : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग; कारण अस्पष्ट

नाशिक | Nashik

येथील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) प्लास्टिक आणि खोके बनविणाऱ्या एका नामांकित कंपनीला आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की परिसरात धुराचे प्रचंड लोट उसळले होते.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर आग (Fire) नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने तातडीने सातपूर अग्निशमन दलाच्या (Satpur Fire Brigade) जवानांना पाचारण करण्यात आले. यानंतर सुमारे एका तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...