Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Fraud Crime : फेसबुकवरील 'फ्रेंडशिप' ठरली साडेपाच कोटींचा सापळा; नाशिकमधील नोकरी...

Nashik Fraud Crime : फेसबुकवरील ‘फ्रेंडशिप’ ठरली साडेपाच कोटींचा सापळा; नाशिकमधील नोकरी घोटाळ्यात रॅकेट उघड

संशयितांचा जामीन फेटाळला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोशल मीडियावरून (Social Media) ओळख वाढवून बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचे (Government Job) आमिष दाखविणाऱ्या हायटेक टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक सायबर पोलिसांना (Nashik Cyber Police) यश आल्यावर ९७ लाख रुपयांच्या फसवणुकीचा वाटणारा हा गुन्हा, आता थेट ५ कोटी ४५ लाख रुपयांच्या घोटाळ्यात बदलला आहे. संशयितांच्या बँक खात्यांमधील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे नोकरीच्या नावाखाली मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील मुख्य संशयित शंभूराजे देशमुख ऊर्फ सचिन हंबीरराव पाटील आणि त्याचा साथीदार रवींद्र शांताराम कदम यांचा जामीन अर्ज नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) मधील गुन्हेगारी कट ग्राह्य धरत पोलिसांना तपासाची मुभा दिली आहे. दरम्यान, हे संशयित फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शोधत आणि त्यांच्याशी मैत्री करत होते. आमची मंत्रालयात ओळख असून शासकीय कोट्यातून नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळण्यासाठी स्वतः चे वैयक्तिक ‘क्यूआर कोड’ वापरत. संशय येऊ नये म्हणून विविध सरकारी विभागांचे हुबेहूब लेटरहेड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या-शिक्के असलेली नियुक्तीपत्रे दिली आहेत.

काठे गल्ली परिसरातील एका ४३ वर्षीय व्यावसायिकाने १३ एप्रिल रोजी नाशिक शहर सायबर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार राजेश भारती, शंभुराजे देशमुख ऊर्फ सचिन पाटील, स्वाती भारती आणि संबंधित खातेधारकांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादीत मुख्य संशयित सचिन पाटीलचे नाव नाही आणि रवींद्र कदमने फिर्यादीचे पैसे परत केले आहेत, असा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी न्यायालयात (Court) केला.

मात्र, सरकारी पक्षाने हा दावा खोडून काढला. फिर्यादीच्या नातलगांना नोकरी लावण्यासाठी २० लाख ५० हजार रुपये कदम च्या खात्यात गेले होते. महत्त्वाचे म्हणजे, कदमच्या खात्यात याव्यतिरिक्त ५ कोटी ४५ लाख ५ हजार ४१२ रुपये जमा झाले असून, या अवाढव्य रकमेचा कोणताही हिशेब संशयितांना देता आलेला नाही. केवळ पैसे परत केल्याने गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन फेटाळला.

न्यायालयात समोर आलेले मुद्दे

  • – मुख्य संशयित सचिन पाटीलच्या खात्यात ४८ लाख, तर रवींद्र कदमच्या खात्यात ५ कोटी ४५ लाखांहून अधिक रक्कम,
  • – तक्रारदार आणि इतर तरुणांची ९७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक झाली असली, तरी खात्यातील रक्कम पाहता बळी पडलेल्यांचा आकडा मोठा असण्याची शक्यता.
  • – संशयितांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चेंटिंगमधून लोकांची फसवणूक करण्याचा एकत्रित कट रचल्याचे सिद्ध.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 – रस्ते विकासकामांना वेग; रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण...

0
नाशिक : प्रतिनिधी Nashik सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांना वेग आला असून, कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (NTKMA) गुणवत्ता नियंत्रण पथकाने तीन...