Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik Heat Wave News : नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण; शहराचा पारा थेट...

Nashik Heat Wave News : नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण; शहराचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसवर

मोसमातील उच्चांकी तापमान, उन्हाने लाहीलाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) सूर्याच्या प्रखर झळा सोसाव्या लागत असून, सोमवारी (दि.११) शहराचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. या मोसमातील हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान (Temperature) ठरले आहे. रात्रीचे किमान तापमानही २६ अंशांवर असल्याने नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण झाले आहेत.

- Advertisement -

नाशिकच्या हवामान इतिहासात (Climate History) २०११ पर्यंत तापमानाने कधीही ४२ अंशांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा फटका नाशिकलाही बसत आहे. २८ एप्रिल २०१९ रोजी ४२.८ अंश अशी सर्वोच्च नोंद झाली होती. सोमवारची ४२ अंशांची नोंद ही गेल्या काही वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पातळी ठरली आहे.

उन्हाच्या (Summer) तीव्रतेमुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) १३ मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

शिवडीत ४६ अंश नोंद

निफाड तालुक्यातील शिंवडी येथे तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांसह शेतीला मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पालेभाज्या जळून खाक होत असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. कसबे सुकेणे परिसरातही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे.

मान्सूनसाठी पोषक वातावरण

राज्यात वाढलेल्या कमाल व किमान तापमानामुळे हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल इतका कमी झाला असून, ही स्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पोषक मानली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात झालेली वाढआणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ६० ते ६५ पूर्व रेखांशावर निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरत आहे.

वर्षनिहाय तापमानाची स्थिती (अंश सेल्सिअसमध्ये)

तारीख तापमान
२८ एप्रिल २०१९ – ४२.८ (सर्वोच्च)
११ मे २०२६ – ४२.०
२५ एप्रिल २०२६ – ४१.५
१० एप्रिल २०२५ – ४१.३
२३ मे २०२४ – ४२.०

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...