Friday, April 17, 2026
Homeक्राईमNashik IT Case: डिलिट 'चॅट'चा 'रिटर्न' गेम; व्हॉट्स ॲप उलगडणार खरं प्रकरण

Nashik IT Case: डिलिट ‘चॅट’चा ‘रिटर्न’ गेम; व्हॉट्स ॲप उलगडणार खरं प्रकरण

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएसमधील लैंगिक शोषण, विनयभंग प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अटकेत असलेले संशयित शफी शेख आणि रझा मेमन यांना पुन्हा १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे तपासाची चक्रे वेगाने फिरत असतानाच दुसरीकडे कारागृहात मारहाण झाल्याचा खळबळजनक दावा संशयितांनी केल्याने प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

या प्रकरणातील तपासाची व्याप्ती प्रत्यक्ष विधानांपुरती मर्यादित नसून, संशयितांचे मोबाईल फोन साक्षीदार ठरणार आहेत. अभियोग कक्षाच्या सहायक संचालक ॲड. किरण बेंडभर यांनी गुरुवारी (दि. १६) या प्रकरणात युक्तिवाद करताना पीडित महिलांना कशाप्रकारे जाळ्यात ओढले गेले आणि संवादाचे स्वरूप काय होते याचे तांत्रिक पुरावे मिळवणे अनिवार्य आहे, असे नमूद केले.

- Advertisement -

मोठी बातमी! खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर कारचा भीषण अपघात

तर सुनावणीदरम्यान संशयितांनी न्यायाधिशांसमोर नाशिक मध्यवर्ती कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला. या आरोपाची गंभीर दखल घेत न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तुरुंग प्रशासनाकडून यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून, या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

दोषी असल्यास फाशी द्या, पण…
न्यायालय परिसरात संशयितांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. माध्यमांशी बोलताना एका नातेवाईकाने, जर आमची मुले दोषी असतील, तर त्यांना खुशाल फाशी द्या. पण या कायदेशीर प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात द्वेष पसरवू नका असे म्हटले.

Paratwada Video Scandal: मोबाईलमधील व्हिडिओंचा डेटा, विकृत स्पर्धा; अयानचा व्हिडिओ कांड असा आला समोर

कार्यालयाला टाळे; कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’
प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता जनक्षोभ पाहता कंपनी प्रशासनाने नाशिकमधील आपले कार्यालय तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तपासात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा जपली जावी, यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आल्याचे कळते. व्यवस्थापनाने ईमेलद्वारे ही माहिती कर्मचाऱ्यांना कळवली असून, सध्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

महिला

Rahul Gandhi: महिला आरक्षण बिलाचा सक्षमीकरणाशी…राहुल गांधी संसदेत काय म्हणाले?

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमहिला आरक्षण आणि परिसीमनशी संबंधित तीन विधेयकांवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१७ एप्रिल) लोकसभेत चर्चा सुरु झाली. पहिल्या दिवशी १३...