नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर होणार असल्याचे निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव अंतिम झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन लवकरच अधिकृत घोषणा करणार आहेत. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदे सेनेने महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : Nashik Mayor Election : मोठी बातमी! भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार अर्ज
ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या सीमा पवार यांनी अर्ज भरला आहे. तर शिंदे सेनेकडून (Shinde Shivsena) उपमहापौरपदासाठी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये महपौरपदासह उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चुरस वाढल्याचे दिसत आहे. आता माघारीच्या दिवशीच नाशिकचे महापौर आणि उपमहापौर पदाबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार! महाजनांनी बोलावली नगरसेवकांची बैठक, कुणाला मिळणार संधी?
आज (मंगळवारी) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत महापौर, उपमहापौरपदासाठी (Mayor and Deputy Mayor) अर्ज विक्री सुरु होती. त्यानंतर मनपा मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात दुपारी तीन वाजेपर्यत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर थोड्याच वेळात भाजपचे आडके आणि सानप महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याकरिता महापालिकेत जाणार आहेत.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेले महापौर पदासाठी अर्ज
दरम्यान, महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजपने (BJP) शिंदेंची सेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही मित्रपक्षांना ‘बिनअटी’ एकत्र येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, या प्रस्तावामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती किंवा इतर सत्तेतील पदांबाबत कोणतीही स्पष्ट हमी नसल्याचे समोर आल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे आज शिंदे सेनेकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.





