Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Municipal Corporation Election : १२२ जागांसाठी तिरंगी–बहुरंगी लढती; ३० हून अधिक...

Nashik Municipal Corporation Election : १२२ जागांसाठी तिरंगी–बहुरंगी लढती; ३० हून अधिक प्रभागांमध्ये चुरस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation Election) १२२ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून,शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये तिरंगी व बहुरंगी लढती रंगणार आहेत. निवडणूक रिंगणात माजी महापौर, उपमहापौरांसह सहा ते सात वेळा महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केलेले अनुभवी नगरसेवक पुन्हा नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : १२२ जागांसाठी १३९० रिंगणात; एकूण ६८९ उमेदवारांची माघार

या निवडणुकीत विशेषतः भाजपमध्ये (BJP) बंडखोरीचे प्रमाण वाढलेले आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत पक्षांतराचा मार्ग स्वीकारला खरा. मात्र, यातील मोजक्यांनाच इतर पक्षांनी आपल्यामध्ये सामावून घेतले. मात्र, ज्यांची दुसऱ्या पक्षात प्रवेशाची द्वारे बंद झाली ते काही ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या घडामोडींमुळे १२२ पैकी तब्बल ३० ते ३५ ठिकाणी निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे.

हे देखील वाचा : Malegaon Municipal Corporation Election : ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात; २२५ इच्छुकांची माघार

दरम्यान, भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी (दोन्ही गट), काँग्रेस, मनसे तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये थेट सामना होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. काही प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील उमेदवार (Candidate) आमनेसामने उभे ठाकल्याने ही निवडणूक अधिकच चर्चेत आली आहे.

लक्षवेधी लढती असलेले प्रमुख प्रभाग

प्रभाग क्रमांक १ मध्ये – अरुण पवार (भाजप) विरुद्ध प्रवीण जाधव (शिंदेसेना) अशी थेट लढत आहे. प्रभाग ५ मध्ये गुरमित बग्गा (भाजप) विरुद्ध अशोक मुर्तडक (शिंदेसेना) तसेच खंडू बोडके (भाजप) विरुद्ध कमलेश बोडके (शिंदेसेना) यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. प्रभाग ७ मध्ये योगेश हिरे (भाजप) विरुद्ध अजय बोरस्ते (शिंदेसेना), प्रभाग ९ मध्ये अमोल पाटील (भाजप) विरुद्ध प्रेम पाटील (शिंदेसेना) तर प्रभाग १० मध्ये विश्वास नागरे (भाजप) विरुद्ध शशी जाधव (अपक्ष) अशी तिरंगी शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik MC Election : पंचवटीत रंगले ‘माघारी’ नाट्य; अपक्षांमुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धास्ती

प्रभाग ११ आणि १३ मध्ये तर बहुरंगी लढती होत असून भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, मनसे व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १५ मध्ये मिलिंद भालेराव (भाजप) विरुद्ध प्रथमेश गिते (उद्धवसेना) यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. याशिवाय प्रभाग १७ मध्ये दिनकर आढाव (भाजप) विरुद्ध राजेश आढाव (शिंदेसेना) यांच्यातील सामना विशेष लक्ष वेधून घेत आहे. प्रभाग २०, २४, २६, २७ आणि २९ मध्येही भाजप विरुद्ध शिंदेसेना किंवा अपक्ष अशी सरळ लढत पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी...