Thursday, August 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik MHADA Fraud : रात्रभर बसून बनवले बनावट नकाशे; संशयित परदेशीच्या पोलीस...

Nashik MHADA Fraud : रात्रभर बसून बनवले बनावट नकाशे; संशयित परदेशीच्या पोलीस कोठडीत वाढ

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​म्हाडा घोटाळा प्रकरणात (Mhada Scam Case) अटक केलेला भूमी अभिलेख विभागाचा मेंटेनन्स सर्वेअर श्रीकांत प्रकाश परदेशी (४२) याच्या घरझडतीत पोलिसांच्या (Police) हाती काहीही लागले नसले, तरी त्याच्यासह संशयितांनी शासकीय कार्यालयाचाच गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी भूमी अभिलेख कार्यालयात रात्रभर बसून बनावट नकाशे तयार केले आणि त्यावर स्वाक्षऱ्या व नाेंदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

- Advertisement -

​या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने संशयित परदेशी याच्या पोलीस कोठडीत (Police Custody) शुक्रवारी (दि. १०) आणखी एक दिवसाची वाढ केली आहे. आता रविवारी(दि. १२) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, तपासाच्या या चक्रात आणखी कोणते ‘बडे मासे’ अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परदेशी याने पदाचा गैरवापर करत विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणेलाच हाताशी धरले. संशयितांनी थेट भूमी अभिलेख कार्यालयातच  बसून जमिनीचे तुकडे पाडणारे आणि क्षेत्रफळ ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी दाखवणारे हुबेहूब बनावट नकाशे तयार केले आणि ते हस्ताक्षरित केले.

​आता या रात्रीच्या खेळात परदेशीला कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली? यात बाहेरील कोणत्या मध्यस्थांचा किंवा बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग आहे? या सर्व बाबींचा कसून तपास करणे बाकी असल्याने पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने (Court) काेठडीत वाढ केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ निरीक्षक डाॅ. आंचल मुदगल यांच्या पथकाने या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी झालेली ही सहावी आणि भूमी अभिलेख विभागातील दुसरी अटक आहे.

​फॉरेन्सिक रिपोर्टमुळे बुरखा फाटला

​राज्य शासनाच्या २०१३ च्या गृहनिर्माण धोरणानुसार, ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर प्रकल्प उभारताना २० टक्के जागा म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र, परदेशीने नकाशांमध्ये फेरबदल करून म्हाडाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या नकाशांची फॉरेन्सिक तपासणी केली असता, त्यावरील खाडाखोड आणि फेरबदल थेट परदेशीच्याच हस्ताक्षरात असल्याचे सिद्ध झाले आहे. या शासकीय मेजरमेंटच्या खेळामुळे शेकडो सर्वसामान्य नागरिक परवडणाऱ्या घरांपासून वंचित राहिले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली...