Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याप्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रमाने नाशिकची वाटचाल कुपोषण मुक्तीकडे

प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रमाने नाशिकची वाटचाल कुपोषण मुक्तीकडे

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा परिषद (Nashik Zilla Parishad) व मुंबईच्या आयआयटी (IIT) यांच्या प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रमामुळे नाशिकची वाटचाल कुपोषण मुक्तीकडे होऊ शकते असा सुर प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला आहे. सद्यस्थतीमध्ये नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ० ते ५ वर्ष वयोगटातील एकूण बालकांची संख्या ३,०९,७१८ असून त्यापैकी ४२३ बालके अती कुपोषीत तर २१७४ बालके कुपोषण श्रेणीमध्ये आहेत. या कार्यक्रमामुळे हे कुपोषण (Malnutrition) कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे….

- Advertisement -

या कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यांमधून ३०० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती व त्यांना मार्च महिन्यामध्ये जिल्हास्तरावर या कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण (Intensive Training) देण्यात आले. ३०० प्रशिक्षणार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करत होते. त्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थींने प्रत्येकी १० बालकांचा सखोल अभ्यास केला. या ३०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी अंतिम परीक्षेमधून ५९ मेंटर व ३० फॅसिलीटर म्हणून निवड करण्यात आली आहे.

तसेच मेंटर व फॅसिलीटेटर या पुढे जिल्हयातील सर्व आरोग्य विभाग व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्तनपानासाठी क्रॉस कँडल होल्ड या पध्दतीने स्तनपान करण्यावर भर देण्यात आला असून त्याचबरोबर प्रभावी लॅचिंग, स्तनपान करतांना सुरुवातीचे संकेत कसे ओळखावे, गरोदर मातेने गरोदरपणात घ्यावयाचा पोषण आहार व बाळाच्या ६ महिने वयानंतर सुरु करण्यात येणार्‍या पूरक आहारावर विशेष भरत देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांच्या संकल्पनेतून बाळाच्या जन्मानंतर १ तासाच्या आतच स्तनपान सुरु करणे व प्रसुती झालेल्या मातांना प्रभावी स्तनपानाबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे बाळाचे वजन वाढीस मदत होत आहे. यावर सनियंत्रक दिपक चाटे, डॉ. सुधाकर मोरे, डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. हर्षल नेहेते, डॉ. दिपक लोणे, डॉ. युवराज देवेरे, व डॉ. हर्षलकुमार महाजन यांचे विशेष लक्ष्य त्यावर आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या