Friday, June 19, 2026
HomeनाशिकNashik NMC News : नगरसेवकांना प्रशासनाचा दिलासा; 'ही' तरतूद ठेवली कायम

Nashik NMC News : नगरसेवकांना प्रशासनाचा दिलासा; ‘ही’ तरतूद ठेवली कायम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रशासकीय राजवटीनंतर सुमारे चार वर्षांनी लोकप्रतिनिधी राजवटीत आज (सोमवारी) अंदाजपत्रक सादर झाले. त्यात नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी (Corporators) प्रभाग विकास आणि स्वेच्छा निधीची तरतूद कायम ठेवत प्रशासनाने अर्थसंकल्पात दिलासा दिला आहे.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकाच्या (Nashik Municipal Corporation) २०२६–२७ च्या मूळ अंदाजपत्रकात प्रती नगरसेवक ३० लाख रुपयांचा प्रभाग विकास निधी आणि ८ लाख रुपयांचा स्वेच्छा निधी कायम ठेवण्यात आला आहे. २०२५–२६ च्या सुधारीत अंदाजपत्रकात १३२ नगरसेवकांसाठी प्रभाग विकास निधीपोटी एकूण ३९.६० कोटी रुपये तर स्वेच्छा निधीसाठी १०.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

हे देखील वाचा : Nashik NMC News : महापालिकेचे ‘इतक्या’ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर

उपलब्ध कालावधी कमी असल्याने हा निधी (Fund) पूर्णतः खर्च होण्याबाबत अनिश्चितता होती. याची दखल घेत प्रशासनाने न खर्च झालेला निधी पुढील आर्थिक वर्षात पुनश्च उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नगरसेवकांना विकासकामे राबविताना अडचण येणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, सन २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात (Nashik NMC Budget) ९४३.०९ कोटी रुपयांची आरंभीची शिल्लक गृहीत धरत २,०११.८५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवण्यात आले आहे. अखेरीस ९.८५ कोटी रुपयांची शिल्लक दर्शविण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...