Wednesday, September 30, 2026
HomeनाशिकNashik News: महापालिकेच्या २०८ आस्थापनांना नोटीसा; डेंग्यूच्या अळ्यांचा शोध

Nashik News: महापालिकेच्या २०८ आस्थापनांना नोटीसा; डेंग्यूच्या अळ्यांचा शोध

शासकीय कार्यालये, विविध ठिकाणी मलेरिया विभागाची मोहीम

नाशिक | प्रतिनिधी
पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी शहरात डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेचा मलेरिया विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. शहरातील विविध भागांत डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असल्याने महापालिकेच्या पथकांकडून अळी शोध मोहीम आणि घराघरांत तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये निष्काळजीपणा आढळलेल्या शासकीय कार्यालयांसह विविध २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मलेरिया विभागप्रमुख डॉ. रविंद्र ढोले यांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद नाशिक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव बासह आठ शासकीय कार्यालयांमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. याशिवाय बांधकामस्थळे, रिकामे प्लॉट, बेसमेंट, स्क्रैप डेपो, टायर दुकाने तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांची तपासणी केली जात आहे. पाणी साचून राहिल्यास डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती वाढत असल्याने संबंधितांना पाणी साचू न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

ओला-उबेर-रॅपिडोवर सरकारचा ‘ब्रेक’! १ सप्टेंबरपासून नियम बदलणार

यंदाच्या सुरुवातीला डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. जानेवारीत सहा, फेब्रुवारीत तीन, मार्चमध्ये दोन, एप्रिलमध्ये एक, मेमध्ये तीन आणि जूनमध्ये आठ रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली. परिणामी जुलैमध्ये डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनही रुग्णसंख्येत वाढ झाली असून, अवघ्या १४ दिवसांत २९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतची डेंग्यू रुग्णसंख्या ८५ वर पोहोचली आहे.

दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. संभाव्य साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मलेरिया विभागाने अळी शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

जुलैमध्ये १२०, ऑगस्टमध्ये ८८ नोटिसा
डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या आस्थापनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत एकूण २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी जुलैमध्ये १२०, तर ऑगस्टमध्ये ८८ आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पुढील काळातही तपासणी मोहीम सुरू राहणार असून, नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...