Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : २ हजार ५५८ रेशन दुकानांना 'नो नेटवर्क' समस्या; लाभार्थ्यांना...

Nashik News : २ हजार ५५८ रेशन दुकानांना ‘नो नेटवर्क’ समस्या; लाभार्थ्यांना शिधा मिळण्यास अडचण

तलाठ्यांची नोडल अधिकारीपदी नेमणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रेशन दुकानातील (Ration Shop) नेटवर्क समस्येमुळे जिल्ह्यातील (District) २६०८ दुकानांमधील २५५८ दुकानांना नो नेटवर्क समस्या भेडसावत आहे तर ५० दुकानांना अधूनमधून नेटवर्क मिळत आहे. यामुळे ईकेवायसीलाही अडथळा येत असून, रेशन लाभार्थीना (Beneficiaries) अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तलाठींची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या निर्देशांनुसार लाभार्थ्यांना रेशन देण्यात येत आहे.

- Advertisement -

ग्रामीण किंवा दुर्गम भागात इंटरनेट (Internet) असुविधा, कनेक्टिव्हीटीची कमतरता यामुळे ई-पॉज मशिनद्वारे ओटीपी येत नसल्याने रेशन मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांसह नाशिक आणि मालेगाव शहर (Nashik and Malegaon City) अशा १७ विभागांमध्ये ई-पॉज मशिनद्वारे रेशनचे वाटप करण्यात येते. ग्रामीण भागात आणि अतिदुर्गम भागात इंटरनेट सुविधा नसल्याने ई-पॉज मशिनद्वारे पाठविण्यात आलेला ओटीपी लाभाथ्यांच्या मोबाईलवर प्राप्त होत नाही.

दरम्यान, यामुळे बायोमेट्रीक प्रमाणीकरण करण्यात अडचणी येतात. परिणामी लाभार्थी धान्यापासून वंचित रहात असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला (District Supply Department) प्राप्त होत होत्या. यावर उपाय म्हणून पुरवठा विभागाने गावातील तलाठी अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे धान्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक गावात तलाठ्यावर जबाबदारी

रेशन वाटपच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असून, त्याच्यावर वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रेशन वाटपासाठी साधारणतः प्रत्येक गावातील तलाठी यांनाच नोडल अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे.

नो नेटवर्कमधील सर्वाधिक दुकाने नाशिक, मालेगावात

नो नेटवर्कमधील दु‌कानामध्ये कोणतेही नेटवर्क नसलेली नाशिकमध्ये एकूण ३८५ दुकाने आहेत. त्या खालोखाल मालेगाव ३२४, सुरगाणा १५३ १८४, बागलाण या दुकानांमध्ये लाभार्थ्यांना रेशन मिळण्यास अडचणी येत आहेत. यास्तव पुरवठा विभागाने याठिकाणी तलाठीला नोडल अधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत. त्यांच्या निर्देशांनुसार ईकेवायसी नसलेल्या लाभाथ्यर्थ्यांना रेशन देण्यात येत आहे.

तालुका एकूण रास्त भाव दुकाने नेटवर्क नसलेली दुकाने नेटवर्क क्षेत्रातील दुकाने
सुरगाणा १९० १५३ ३७
कळवण १५० १४२ ०८
बागलाण १८७ १८४ ०३
दिंडोरी १७३ १७१ ०२
चांदवड १२५ १२५ ००
देवळा ६४ ६४ ००
मालेगाव १४९ १४९ ००
नाशिक ३८५ ३८५ ००
इगतपुरी १५१ १५१ ००
मालेगाव ३२४ ३२४ ००
नांदगाव १५६ १५६ ००
निफाड १५४ १५४ ००
पेठ १३२ १३२ ००
सिन्नर १४९ १४९ ००
त्र्यंबकेश्वर १२८ १२८ ००
येवला १४० १४० ००
एकूण २६०८ २५५८ ५०
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...