Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : वाहन बाजाराचा 'गिअर' जोरात; अक्षय्यतृतीयेला जिल्ह्यात २०९ नव्या वाहनांची...

Nashik News : वाहन बाजाराचा ‘गिअर’ जोरात; अक्षय्यतृतीयेला जिल्ह्यात २०९ नव्या वाहनांची नोंद

आरटीओला एक कोटींचा महसूल!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह नाशिकच्या वाहन बाजारपेठेत पाहायला मिळाला. अस्मानी संकटाने घेरलेले असतानाही नाशिककरांनी (Nashik) शुभमुहूर्तावर नवी वाहने घरी नेण्याला पसंती दिल्याचे दिसून आले. या मुहूर्तावर जिल्ह्यातून २०९ वाहनांची नोंद नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली असून या माध्यमातून आरटीओला (RTO) एक कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत नाशिक शहर आणि जिल्ह्याला (Nashik City and District) अवकाळी पावसाचा फटका बसला होता. द्राक्षबागायतदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत शेतकरी कुटुंबांनी शेतीच्या मशागतीसाठी नऊ नवेकोरे ट्रॅक्टर खरेदी केले. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य कायम असल्याचे दिसून आले. न्यू मेंबर इन माय फॅमिली म्हणत अनेक कुटुंबांनी सकाळीच विविध शोरूममध्ये गर्दी केली होती. रविवारी (दि.१९) सुट्टी असल्याने अनेक नोंदणी प्रक्रिया प्रलंबित होत्या, ज्याची अधिकृत नोंदणी सोमवारी (दि. २०) आरटीओ कार्यालयात सकाळपासून सुरू होती.

एकूणच अवकाळीच्या सावटातही नाशिकच्या ऑटोमोबाईल क्षेत्राने अक्षय्यतृतीयेला घेतलेली ही झेप अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक चिन्ह मानली जात आहे. आरटीओमध्ये झालेली २०९ वाहनांची नोंद ही केवळ एका दिवसाची अधिकृत आकडेवारी आहे. मात्र, प्रत्यक्षात विक्री झालेल्या वाहनांचा आकडा दोन हजारांच्या पार असण्याचा अंदाज आहे. अनेक वाहनधारकांनी मुहूर्तावर डिलिव्हरी घेतली असून, त्यांची कागदपत्रे (Document) आणि कर भरण्याची प्रक्रिया पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.

मोटार कारची सर्वाधिक चलती

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर एकूण २०९ नव्या वाहनांची अधिकृत नोंदणी झाली. यातून शासनाला १ कोटी ६ लाख ३४ हजार रुपयांचा महसूल मिळाला. नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये ङ्गमोटार कारफ श्रेणीने सर्वाधिक महसूल मिळवून दिला आहे. ८० नवीन मोटार कारची नोंदणी झाली असून त्यातून ९३.६० लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. त्याखालोखाल ७८ मोटारसायकली आणि स्कूटर्सची नोंदणी झाली आहे.

वाहन नोंदणीचा तपशील

वाहन प्रकारसंख्याप्राप्त महसूल (रुपये)
मोटार कार८० ९३,६०,९३०
मोटार सायकल/स्कूटर७८ ७,३७,५०८
थ्री व्हीलर (पॅसेंजर)२५ ४८,५१६
मोपेड१२ ५५,८५०
कृषी ट्रॅक्टर०९ ६००
मोटार कॅब०४ २,४२,००३
क्रेन माउंटेड व्हेईकल०१ १,८९,२८०
एकूण२९९ १,०६,३४,६८७

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...