नाशिक। प्रतिनिधी Nashik
सप्तशृंगी गडावर दर्शन घेऊन जळगावला परतणाऱ्या सूर्यवंशी कुटुंबाच्या स्कॉर्पिओ कारचा (एमएच ४६ एएल ५१२६) म्हसरुळजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला.
- Advertisement -
दिंडोरी रोडवरील झाडावर भरधाव कार आदळल्याने कमलाबाई सूर्यवंशी (७२, जळगाव) यांचा मृत्यू झाला, कारमधील उमेश कडू धोबी आणि विजय रामदास सूर्यवंशी (जळगाव )हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे . कारमधील अन्य आठ जण, त्यात एका लहान मुलीचाही समावेश असून, किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.




