नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पर्यावरण रक्षणासाठी (Environmental Protection) महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४७,१७१ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेतला आहे. छापील वीजबिल नाकारून ‘गो-ग्रीन’ सेवेला पसंती दिली आहे. कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपयांप्रमाणे ४७, १७१ ग्राहकांची ५६ लाख ६० हजार रुपयांची वार्षिक बचत होत आहे.
नाशिक परिमंडलातील ग्राहकांना सरळसोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी (Go-Green Service) कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी पोस्टर्स महावितरणकडून तयार करण्यात आले आहे. त्यावर गो ग्रीन माहिती व सोचत या संदर्भातील व्हिडीओचा क्यूआर कोडदेण्यात आला आहे. ग्राहकांनी मोबाईलने हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीतून गो-ग्रीन नोंदणीबाबत माहिती ग्राहकांनी मिळत आहे. याबाबतचे पोस्टर्स महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्र परिसर तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. वीजग्राहकांनी त्यावरील क्यू आर कोड मोबाईलने स्कॅन करून चित्रफितीत दिलेल्या माहितीनुसार गो-ग्रीन नोंदणी करावी.
वीजबिलासाठी (Electricity ) ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दरमहा प्रत्येक बीजबिलामागे १० रूपयांची सूट देण्यात येत आहे. इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा व सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. नाशिक मंडळात सद्यस्थितीत २५,२५१, मालेगाव मंडळातील ३,०२५ आणि अहमदनगर मंडळातील १८,८७५ अशा एकूण ४७,१७१ वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग घेतला आहे. पर्यावरण रक्षणासाठी महावितरणकडून ‘गो ग्रीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना दर बिलात १० रूपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलात वार्षिक १२० रुपयाची बचत होणार आहे.
वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसने दरमहा वीजबिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तत्काळ घरबसल्या ऑनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे. सोबतच ऑनलाईझ बीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट दिली जात आहे.वीजग्राहकांना छापील बीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई- मेल द्वारे प्राप्त झालेले दरमहा बीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीत जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www. mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील अकरा महिन्यांचे असे एकुण चारा महिन्याचे वीज बिले आवश्यकतेप्रमाणे बीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.
महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अँप किंवा संकेतस्थळाच्या https:// billing mahadiscom.in/ gogreen.php लिंक वर जाऊन करावी. याबाबतची अधिक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.पर्यावरण समृद्धीसाठी आणि वीज खर्च कमी करण्यासाठी गो ग्रीन या पर्यायाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड मोबाईलने स्कॅन करून चित्रफितीतून संपूर्ण माहिती प्राप्त करून गा ग्रीन नोंदणी ग्राहकांनी करावी, असे आवाहन महावितरणने (MahaVitaran) केले आहे.
विभागनिहाय ‘गो ग्रीन’ नोंदणी
कळवण – ७२३
मालेगांव – ४८२
मनमाड – १,२६७
सटाणा – ५५३
चांदवड – १,५८८
नाशिक ग्रामीण – ३.३६०
नाशिक शहर १ – ७,०४७
नाशिक शहर २ – १३,२५६