Thursday, July 2, 2026
Homeनाशिकमालेगावी ४९ करोना पाॅॅझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली ५०९ वर, नाशिकमध्येही एक अहवाल बाधित

मालेगावी ४९ करोना पाॅॅझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली ५०९ वर, नाशिकमध्येही एक अहवाल बाधित

मालेगावमध्ये ४९, तर नाशिक शहरातील कोणार्कनगर येथील एक संशयित रुग्ण करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी 

आज सकाळी पुन्हा मालेगावमध्ये करोनाचा उद्रेक झाला. २५५ अहवालात ४९ मालेगाव येथील तर एका नाशिक शहरातील रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णांमुळे मालेगावमधील रुग्णसंख्या ५०९ वर तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याची ६२२ वर पोहोचली आहे. तर नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या वाढून आज ४५ वर गेली आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नाशिकमध्येही करोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे.  काल नाशिक शहरात १८ रुग्ण आढळून आलेल असतानाच आज आणखी कोणार्कनगरमधील रुग्णाचा अहवाल बाधित आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कालचे ८ रुग्ण हे सातपूर कॉलनीतील होते. तर इतर शहरातील नवीन सिडको, पाटील नगर, श्रीकृष्ण नगर, हिरावाडी आणि मालपाणी सफ्रोन, इंदिरानगर, धात्रक फाटा, तारवाला नगर आणि नाशिक शहरातील एक असे रुग्ण होते.

तर आज सकाळी कोणार्कनगर येथील एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण काल आढळून आलेल्या रुग्णाचा निकटवर्तीय असल्याचे समजते. तर मालेगावमध्ये आज आढळून आलेले रुग्ण हे इतर बाधित रुग्णांचे निकटवर्तीय असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

RTI Maharashtra : अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका, माहिती अधिकार कायद्यातील बदलांना...

0
मुंबई । Mumbai माहितीचा अधिकार (RTI) अधिक सक्षम आणि पारदर्शक होण्याऐवजी, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे नवे नियम अखेर मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. ज्येष्ठ...