Sunday, May 17, 2026
Homeक्राईमNashik News गृहप्रवेशाच्या मंगलमय वातावरणात संपूर्ण कुटुंब उत्साहात अन्…; गच्चीवरून पडून पाहुण्याचा...

Nashik News गृहप्रवेशाच्या मंगलमय वातावरणात संपूर्ण कुटुंब उत्साहात अन्…; गच्चीवरून पडून पाहुण्याचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांपूर्वी ते शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नाशिकमध्ये (Nashik) आले. गृहप्रवेशाच्या मंगलमय वातावरणात संपूर्ण कुटुंब उत्साहात होते. मात्र, एका अनपेक्षित अपघाताने (Accident) या आनंदाचे रूपांतर क्षणात कायमच्या दु:खात गेले. नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा गच्चीवरून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला.

- Advertisement -

मूळचे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मऊ येथील रहिवासी असलेले काशिनाथ आत्मजा गौड (५५) हे दिंडोरी रोडवरील पंचवटी परिसरातील संस्कृती रो-हाऊसेस येथे आपल्या नातेवाईकांच्या वास्तुशांती सोहळ्यासाठी आले होते. गुरुवारी (दि.१४) रात्री सर्व विधी आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रो हाऊसच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले. १५ मे रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास गच्चीवर फिरत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली असलेल्या पक्क्या फरशीवर कोसळले.

हे देखील वाचा : Nashik Suicide News : उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

दरम्यान, या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि ते बेशुद्ध पडले. आवाजामुळे धावत आलेल्या नातेवाईकांनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. जावई मदनभाई गौड यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

वास्तुशांतीऐवजी पसरली अशांतता

ज्या घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी मंत्रोच्चार करण्यात आले होते, तिथे आता शोककळा पसरली आहे. केवळ एका सेकंदाचा तोल जाण्याने या कुटुंबाचा आधार हिरावून गेला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार कोरडे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गावाजवळील जेएमसीटी सिटी कॉलेजसमोरील (JMCT College) काद्री एम्पायर इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची...