Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : जिल्ह्यातील ५८४ सरपंचांना पुन्हा मिळणार 'हे' अधिकार

Nashik News : जिल्ह्यातील ५८४ सरपंचांना पुन्हा मिळणार ‘हे’ अधिकार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा (Nashik District Grampanchyat) कार्यकाळ संपला आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेने बुधवारी (दि.४) काढले.यामुळे जिल्ह्यात ५८४ ग्रामपंचयतींमध्ये पुन्हा सरपंचांना त्यांचे अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतींमधील लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२६ अखेर संपला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया राबविली जात असताना सरपंच परिषदेने सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्तीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या संदर्भातील आदेश जारी करत सरपंचांनाच (Sarpanch) अधिकार देण्यासंदर्भात आदेश दिले. या आदेशानुसार काही जिल्ह्यांमधे सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, नाशिक जिल्ह्यात ही प्रक्रिया पार पडलेली नव्हती.

अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (CEO Omkar Pawar) यांनी बुधवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केला. त्यानुसार जिल्ह्यात ५८४ ठिकाणी सरपंचांनाच अधिकार बहाल केले आहेत. गावकारभार त्यांच्याच अधिपत्याखाली सुरु राहणार आहे.

नियुक्तीला २६ ठिकाणी अडचण

प्रशासकपदी नियुक्ती करण्यापूर्वी प्रशासनाने संबंधित सरपंचांची पार्श्‍वभूमी तपासून घेतली आहे.यामध्ये सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झालेला असल्यास किंवा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असलेल्या, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केलेला नाही.त्यानुसार २६ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या ठिकाणी प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्यांनाच संधी मिळणार आहे.

जानेवारीपूर्वीच्या ग्रामपंचायतींमधेही प्रशासक?

जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींमध्ये जानेवारी २०२६ अखेर प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला सरपंच परिषदेने हरकत घेतल्यामुळे या संदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केल्यास या ठिकाणीही सरपंचांना संधी मिळू शकते, अशी शक्यता असून यासंदर्भात मात्र अधिकृत आदेश नाही.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...