Wednesday, May 6, 2026
HomeनाशिकTrimbakeshwar News : मुखदर्शन अचानक बंद झाल्याने भाविकांचा गोंधळ; सुरक्षारक्षकाकडून एकाला बेदम...

Trimbakeshwar News : मुखदर्शन अचानक बंद झाल्याने भाविकांचा गोंधळ; सुरक्षारक्षकाकडून एकाला बेदम मारहाण

नेमकं काय घडलं? Video आला समोर

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार काही काळासाठी बंद होते. यावेळी काही यात्रेकरूंनी येथे गोंधळ घातला. यावेळी देवस्थानचे अधिकारी, पोलीस आणि एमएसएफचे सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून या भाविकांची समजूत काढली. त्यानंतर आता एका भाविकाला देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

- Advertisement -

दर्शनासाठी त्र्यंबकराज मंदिराज (Trimbakeshwar Temple) दरवाजा उघडावा, यासाठी काही भाविकांनी गोंधळ घातला. यात शाब्दिक वादातून हमरीतुमरी झाली. दरम्यान पेड दर्शन रांग प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली बाह्य मुख दर्शन रांग आणि धर्मदर्शन दरवाजातील रांग यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने अल्पकाळासाठी महाद्वार दरवाजा बंद केला होता. परंतु, यावेळी काही भाविकांनी गैरसमजातून वाद केला.

दरम्यान, हा वाद पुढे वाढत जाऊन झटापट आणि मारहाणीत (Beating) रुपांतरीत झाला. यानंतर चार ते पाच सुरक्षारक्षकांनी एका भाविकाला बेदम मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे उपस्थित भाविकांकडून (Devotees) तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या घटनेवर देवस्थान ट्रस्ट काय म्हणाले?

सदर वादाच्या घटनेनंतर देवस्थान ट्रस्ट आपली बाजू मांडताना म्हणाले की, “संबंधित भाविकांनी मंदिराच्या दरवाजाला धक्का देत तोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्याचे ट्रस्टने सांगितले. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने अप्रत्यक्षपणे सुरक्षारक्षकांच्या कृतीचे समर्थन केल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्या

पडसाद : भूसंपादनात अतिरेक नको तर सामंजस्य हवे!

0
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाच्यादृष्टीकोनातून दर बारा वर्षांनी येणारी महापर्वणी असते, यावर कोणाचेही दुमत होणे शक्य नाही. त्यामुळेच सिंहस्थ येण्याच्या पाच ते सहा वर्षे...