Tuesday, September 29, 2026
HomeनाशिकNashik News : भद्रकाली परिसरात नायलॉन मांजामुळे घार जखमी

Nashik News : भद्रकाली परिसरात नायलॉन मांजामुळे घार जखमी

गणपती मंडळाच्या तत्परतेने अग्निशामक दलाची मदत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भद्रकाली परिसरात (Bhadrakali Area) भद्रकालीचा राजा गणपतीजवळ एक मोठी घार (Kite Bird) जखमी अवस्थेत आढळली. नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या या पक्ष्याला हालचाल करणे कठीण झाले होते. प्रसंग ओळखताच मंडळाचे अध्यक्ष यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले.

- Advertisement -

अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक जखमी घारीची सुटका केली व तिला पुढील उपचारासाठी सुरक्षितस्थळी हलवले. नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि नागरिकांना होणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार पुन्हा एकदा गंभीर वास्तव अधोरेखित करतो.

स्थानिक नागरिक व मंडळाकडून नायलॉन मांजावर (Nylon Manja) तातडीने आणि कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...