Tuesday, April 7, 2026
HomeनाशिकNashik News : मेरी कॉलनीत महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण; सोशल मीडियावर...

Nashik News : मेरी कॉलनीत महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण; सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजबाबत संभ्रम

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक शहरातील (Nashik City) मेरी कॉलनी परिसरात (Mary Colony Area) महिलांवर हल्ल्याच्या कथित घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका मेसेजनुसार, एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने महिलांवर आणि मुलींवर (Girl) हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

या व्हायरल मेसेजमध्ये (Message) दावा करण्यात आला आहे की, मेरी कॉलनीतील बंद पडलेल्या इमारतींमध्ये लपून राहणारा एक पुरुष महिलांच्या मागे धाव घेतो, कपडे काढतो व त्यांच्यावर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नव्हे तर, हा प्रकार अनेक महिलांसोबत व एका डॉक्टर महिलेसोबतही घडल्याचे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, काही रहिवाशांकडून या मेसेजमधील काही बाबींची पुष्टी होत असली, तरी तो पूर्णतः सत्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा मेसेज खरा आहे की अफवा, याबाबत अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे धोकादायक ठरू शकते.

हा मेसेज खरा की खोटा?

सदर मेसेजबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. मात्र, स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, अशी कोणतीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. तथापि, पोलीस यंत्रणा या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून चौकशी सुरू आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगावी व अफवांपासून सावध राहावे

सदर मेसेजमधील आरोप गंभीर असले तरी त्याची सत्यता अद्याप स्पष्ट नाही. पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी व अफवांपासून सावध राहावे.

संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच बंद इमारती किंवा एकांत रस्त्यांवरून जाणे टाळावे.पालकांनी मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी.

गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे

ताज्या बातम्या

Shrigonda : साकळई योजनेस घोड धरणातून पाणी देण्यास विरोध

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda तालुक्यातील घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी घोड धरणातून पाणी देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावामुळे घोड...