Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik News : क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

Nashik News : क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

दहिवड | मनोज वैद्य | Dahiwad

दहिवड गावातील (Dahiwad Village) २४ वर्षीय हरहुन्नरी क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाईन सर्विसेसचे संचालक यश सुनील अहिरे याचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन (Passed Away) झाल्याने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. यशने तालुक्यातील एका महत्त्वपूर्ण क्रिकेट सामन्यात आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दुर्दैवाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

- Advertisement -

सामन्यादरम्यान यशने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत आपली चमक दाखवली. प्रेक्षकांनी त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला. मात्र, तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर (Ground) बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत (Death) घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यशच्या शेवटच्या सामन्याचा (Match) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो शेवटचे फटके मारताना आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होता. मात्र, हा आनंद काही काळच टिकला, व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण भावूक होत आहे. यश हा केवळ क्रिकेटपटू नव्हता, तर ‘आरंभ ऑनलाईन सर्विसेस’ या सेवा केंद्राचा यशस्वी संचालक होता. आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात (Taluka) प्रसिद्ध झाला होता. गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्याने अनेकांची कामे सुलभ केली होती. त्याच्या या सेवाभावी वृत्तीने तो प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकला.

दरम्यान, दहिवडसह संपूर्ण तालुका आज यशच्या या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झाला आहे. मैदानावर शेवटच्या फटक्यांसह संघाला विजयाकडे नेणारा हा खेळाडू मैदानाबाहेर मात्र शेवटची झुंज हरला. यशच्या आईने (Mother) अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याचा सांभाळ करून त्याला मोठे केले होते, त्या आईवर अचानकपणे काळाने केलेल्या या हल्ल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...