Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik News : भावली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Nashik News : भावली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटन आणि पोहण्यासाठी आलेला एक २४ वर्षीय युवक (Youth) बुडाला आहे. अतिक नाशिर खान असे युवकाचे नाव असून त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणाच्या ओवर फ्लोमध्ये बुडाला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

इगतपुरी पोलिसांना (Igatpuri Police) माहिती समजताच त्यांच्या पथकाने तातडीने शोध आणि बचावकार्य सुरु केले होते. यानंतर आज त्याचा मृतदेह (Death Body) शोधण्यात पोलिसांना यश आले. मंगळवारी सकाळी अतिक नाशिर खान रा.आशीर्वाद कॉलनी,एस.व्ही.पी.म्हाडा वर्सोवा,मुंबई हा त्याच्या तीन मित्रांसोबत इगतपुरी तालुक्यातील भावली धरण येथे पोहण्यासाठी आला होता.

हे देखील वाचा : Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”

यावेळी त्यांना भावली धरणाजवळील ओव्हर फ्लोच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला (Drowned) असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी इगतपुरी पोलिसांना दिली होती. यानंतर स्थानिक पानबुड्या व्यक्तींकडून शोध कार्य सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आज दुपारी शोधकार्याला यश आले आहे. तर युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital) पाठविण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या