नाशिक | प्रतिनिधी
टीसीएस कंपनीतील बलात्कार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या दोन गुन्ह्यातील संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले.
२४ मार्च रोजी देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यापासून निदा पसार होती. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. गर्भवती असलेली निदा कंपनी प्रकरणातील नऊपैकी दोन गुन्ह्यात संशयित आहे. कट रचून धर्मांतरचा प्रयत्न केल्याचा ठपका तिच्यावर आहे. निदा खानला एस आय टी पथक नाशिक मध्ये आणल्यानंतर तिची लगेच वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्या नंतर नाशिक रोड न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मोबाईल मधून होणार मोठे खुलासे – निदा खानला अटक झाल्यानंतर तिच्या मोबाईल मधून अनेक डिजिटल पुरावे एस आय टी च्या हाती लागणार आहे. ती सापडत नसल्याने तपासत अनेक अडथळे येत होते.
निदाने तिच्या मोबाईल मधून पीडित मुलीला धर्मांतरासाठी अनेक व्हिडिओ पाठवल्याचे तपासत उघड झाले आहे.




