Saturday, April 25, 2026
HomeनाशिकNashik News : सिंहस्थात एआयचा खुबीने वापर; अपर पोलीस महासंचालकांची माहिती

Nashik News : सिंहस्थात एआयचा खुबीने वापर; अपर पोलीस महासंचालकांची माहिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्यात (Simhastha Kumbh Mela) नाशिककरांसह भाविकांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस दल कमी पडणार नाही. या जागतिक सोहळ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा खुबीने उपयोग केला जाईल. शहरांच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मर्यादित पोलीस मनुष्यबळासारखे प्रश्न सोडवण्यासाठीदेखील हे तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरेल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी दिली. गंगापूर रोडवरील (Gangapur Road) पोलीस आयुक्तालयात काल आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीसह नाशिक परिक्षेत्राच्या नियमित आढावा बैठकीत अपर पोलीस महासंचालक गुप्ता पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेत सूचना केल्या.

- Advertisement -

यानंतर, पत्रकारांना माहिती देताना गुप्ता यांनी सांगितले की, मसिंहस्थासाठी अद्याप दीड ते पावणेदोन वर्षांचा कालावधी हाती आहे. पूर्वतयारीसाठी हा कालावधी पुरेसा आहे. यंदाच्या सिंहस्थात कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्ही नवतंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करणार आहोत. त्याचे पूर्वनियोजन सध्या सुरू आहे. दरम्यान, सिंहस्थ तयारीचा पोलीस दलाचा आढावा घेण्यासोबतच गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना शहर व जिल्ह्याच्या कायदा व्यवस्थेसाठी सूचनाही केल्या. यात प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांना आठवड्यातून नियमित भेट द्यावी, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, तपासी अंमलदारांकडील प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन व निर्देश देण्यासारख्या कामावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, पोलीस खात्याने (Police Department) ई-साक्ष नावाचे ॲप विकसित केले असून पंच फितुरी रोखण्यासाठी त्याचा उपयोग होईल. घटनास्थळी पंचनामा करतानाच नोंदविली जाणारी साक्ष ही कॅमेऱ्यासमोर नोंदविली जाईल. ‘ई साक्ष’ ॲपवर तो व्हिडिओ अपलोड करून न्यायालयासमोर सादरीकरण करताना न्यायाधीश ती साक्ष बघू शकतील. यामुळे कुठल्याही प्रकारच्या दबावाने पंच फितूर होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले

हद्दवाढीचे त्रांगडे सुटणार?

प्रत्येक सिंहस्थात आयुक्तालयाच्या हद्दवाढीच मुद्दा कायम उपस्थित होतो. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारातील तो विषय आहे. त्यांच्याकडून या विषयाचा आग्रह होऊन प्रस्ताव आल्यास तसा विचार केला जाईल असे गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे हद्दवाढीचा गुंता सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

गुप्ता म्हणाले…

– सायबर ठगांचे पोलिसांसह जनतेसमोर मोठे आव्हान
– वाढत्या प्रमाणाबद्दलही चिंता
– नागरिकांनीही सजग आणि शिक्षित राहणे गरजेचे
– सायबर ठगांना बळी पडू नका
– समृद्धी महामार्गावर लूटमारीच्या घटना रोखणार
– आवश्यक उपाययोजना करत आहोत

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...