Thursday, October 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDattatray Bharne : शेतकऱ्यांनो काळजी करू नका, शासन सर्वतोपरी मदत करणार -...

Dattatray Bharne : शेतकऱ्यांनो काळजी करू नका, शासन सर्वतोपरी मदत करणार – कृषीमंत्री भरणे

नाशिक | Nashik

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) धोंडवीरनगर येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatray Bharne) यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गाच्या संकटामुळे तसेच पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. “शेतकऱ्यांनी काळजी करू नये. अडचणीच्या या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -

कृषीमंत्री भरणे म्हणाले की, अल निनोचा प्रभाव, बदलते हवामान आणि पावसातील अनियमितता यामुळे राज्यातील काही भागांमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींची शासनाला पूर्ण जाणीव असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी (Farmer) संवाद साधला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक अधिसूचना शनिवारपर्यंत काढण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

नुकसान निश्चित करण्यासाठी पंचनामे आणि इतर आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात पोहोचले पाहिजेत आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत,” असे निर्देश देत कृषिमंत्र्यांनी दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविताना कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकरी हा शासनाच्या मदतीच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून, सध्याच्या नैसर्गिक संकटात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देताना बँक (Bank) स्तरावर कोणत्याही प्रकारची अडवणूक होऊ नये. पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बँकांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या नुकसानभरपाईसाठी आवश्यक ती कार्यवाही गतिमान करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

ध्वजारोहण

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा : सहा मार्ग बंद; रामकुंडाकडे जाण्यास पर्यायी मार्ग,...

0
नाशिक | प्रतिनिधीसिंहस्थाच्या ध्वजारोहण सोहळा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०२ वाजता रामकुंड (नाशिक) आणि कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर) येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी...