Wednesday, July 22, 2026
Homeमुख्य बातम्याNashik BJP News : कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन ढोंगी - भाजप शहराध्यक्ष...

Nashik BJP News : कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन ढोंगी – भाजप शहराध्यक्ष केदार

नाशिक | Nashik

दिल्लीत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पक्षाच्या (Cockroach Janata Party) वतीने करण्यात आलेले आंदोलन हे पूर्णपणे ‘ढोंगी’ आणि ‘नौटंकी’ असल्याचा आरोप भाजपचे (BJP) नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केला आहे. परवानगी न घेता सुरू केलेल्या या आंदोलनाची दिशा भरकटली असून, हे आंदोलन देशहिताला बाधक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आंदोलनाची दिशा भरकटल्याने विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास

सुनील केदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी परवानगी न घेता आंदोलन सुरू केले. ज्या कारणासाठी देशभरातून विद्यार्थ्यांना बोलावले होते, ते बाजूला राहून आंदोलनात वेगळ्याच आणि देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. ही परिस्थिती “आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी” अशी झाली असून, या प्रकारामुळे भ्रमनिरास झालेले अनेक विद्यार्थी सोशल मीडियावर (Social Media) नाराजी व्यक्त करत घरी परतत आहेत” असे त्यांनी म्हटले आहे.

परदेशातून ‘कॉक्रोच पार्टी’ची स्थापना

कॉक्रोच जनता पार्टीबाबत बोलताना केदार म्हणाले की, “मुळात या पक्षाची स्थापना अभिजित दीपके यांनी परदेशात बसून ऑनलाईन पद्धतीने केली आहे. हवेत पक्ष स्थापन करण्याचा हा भारतातील एकमेव प्रयोग आहे. जर अशा प्रकारे परदेशात बसून राजकारण करता आले असते, तर स्वातंत्र्यापासून आजवर नेत्यांनी खेडोपाड्यांत जाऊन कष्ट उपसले नसते. भारत ही जगातील सर्वात प्रगल्भ लोकशाही असून, समाज आणि जातींमध्ये फूट पाडणाऱ्यांचे हेतू नागरिक नेहमीच हाणून पाडतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या ऐक्याला धोका

आंदोलनातील (Protest) मुला-मुलींचा सहभाग आणि त्यांच्या घोषणा पाहता हा देशाच्या ऐक्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असेही केदार यांनी म्हटले आहे. या आंदोलनाचा मूळ चेहरा लवकरच देशासमोर येईल आणि युवकांना वास्तव समजल्यावर ते भरकटणार नाहीत, असे सांगत त्यांनी या आंदोलनाला तीव्र विरोध दर्शवला.

काँग्रेसविरोधात आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मंगळवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर आज (बुधवारी) भाजपकडून देशभरातील काँग्रेस कार्यालयांवर आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी रेड क्रॉस सिग्नलजवळ आंदोलन केले गेले. यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार देखील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

default-featured-image

Rahul Gandhi : दिल्लीतील लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटीवरून राहुल गांधींचा केंद्र...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयोजित पत्रकार...