Thursday, November 26, 2026
Homeक्राईमNashik News : ​काळ्या काचांची 'प्रवृत्ती' पुन्हा जोरात; वाहतूक शाखेच्या मोहिमेनंतरही नियमभंग...

Nashik News : ​काळ्या काचांची ‘प्रवृत्ती’ पुन्हा जोरात; वाहतूक शाखेच्या मोहिमेनंतरही नियमभंग सुरूच

कारवाईत सातत्य ठेवण्याची नागरिकांची मागणी

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर वाहतूक शाखेने गेल्या महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या शेकडो वाहनचालकांसह (Drivers) थार मालकांवर धडक कारवाई केली होती. मात्र, ही मोहीम थंडावताच शहरात पुन्हा एकदा गडद काळ्या फिल्म (ब्लॅक फिल्म) लावून फिरणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनांवर मोहिमेपुरतीच नव्हे, तर नियमित कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सजग नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानुसार आणि केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार चारचाकी वाहनांच्या काचा पारदर्शक असणे बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा नियम महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार, गेल्या महिन्यात वाहतूक शाखेच्या सर्वच विभागांत एकाच वेळी मोहीम राबवून जागेवरच काळ्या फिल्म काढण्यात आल्या होत्या, तसेच ऑनलाईन दंडही आकारण्यात आला होता. या कारवाईमुळे काही काळ नियमभंगावर आळा बसला होता. परंतु, नियमित तपासणी कमी होताच अनेक वाहनचालकांनी पुन्हा नियमांकडे पाठ फिरवल्याचे मुख्य रस्त्यांवरून दिसून येत आहे. अगदी वर्दळीच्या चौकांसह पाेलीस आयुक्तालयाच्या बाहेर व इतर

शासकीय कार्यालयांच्या (Office) परिसरातही अशी वाहने बिनधास्तपणे उभी असलेली पाहायला मिळतात. शहरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी दुचाकीस्वारांच्या हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्याच धर्तीवर चारचाकी वाहनांच्या काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट यांसारख्या नियमभंगांवरही दैनंदिन पातळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या वाहनचालकांवर समान आणि सातत्यपूर्ण कारवाई झाल्यास वाहतूक शिस्तीला अधिक बळकटी मिळेल, असे मत नागरिकांनी मांडले आहे.

​प्रतिष्ठीतांकडूनच काळ्या काचा?

शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम थंडावताच शहरात पुन्हा एकदा गडद काळ्या फिल्म लावून फिरणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यापैकी अनेक कार शहरातील काही प्रतिष्ठीतांच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. पारदर्शक काचांचा नियम सर्वांसाठी समान असताना, प्रतिष्ठीतांच्या वाहनांमुळे नियमांची पायमल्ली होत असल्याची चर्चा आहे. अशा वाहनांवरही धडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

​पोलिसांची भूमिका

चारचाकी वाहनांना काळ्या फिल्म लावणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. अशा वाहनांविरोधात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. बेशिस्त वाहनचालकांविरोधात पुन्हा मोहीम राबविली जाईल. कोणीही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये.

माधव रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त (शहर वाहतूक शाखा)

​

ताज्या बातम्या

राजसारथी

‘राजसारथी’चा टीडीआर वाद विधिमंडळात; महापालिका स्थायी समितीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीची...

0
नाशिक | प्रतिनिधीइंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेला डीपी रोडच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआरचा वाद आता विधिमंडळात पोहोचला आहे. काँग्रेसचे आमदार विजय...