नाशिक | प्रतिनिधी
इंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेला डीपी रोडच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआरचा वाद आता विधिमंडळात पोहोचला आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, नगरविकास विभागाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.
दरम्यान, विधिमंडळातील प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी (दि. २५) स्थायी समि तीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीची तातडीने बैठक होऊन टीडीआर वितरण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. इंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीच्या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता गेला आहे. या रस्त्यासाठी महापालिकेने ८ हजार २१९ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले असून, त्याच्या मोबदल्यात संस्थेला १६ हजार ४२२ चौरस मीटर क्षेत्राचा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यात आला आहे. या टीडीआरच्या विक्रीतून संस्थेला आणि पर्यायाने सभासदांना बाजारभावानुसार सुमारे १२ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.
मात्र, संस्थेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता तत्कालीन चेअरमन परशुराम निकम, सचिव देविसिंह देशमुख आणि काही संचालकांनी परस्पर टीडीआर विक्री केल्याचा आर ोप आहे. या प्रकरणावर गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू असून, चौकशीची मागणी करण्यात येत आहे. नगरसेविका किरण दराडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट आणि प्रशासन उपायुक्त लक्ष्म किांत साताळकर यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीम मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच आ. वडेट्टीवार यांनी विधिम डळात तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने या प्रकरणाला शासनस् तरावरही महत्व प्राप्त झाले आहे. आता चौकशी समितीच्या अहवालातून टीडीआर वितरण प्रक्रिया, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि कथित अनियमिततांबाबत काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.




