Tuesday, October 13, 2026
HomeनाशिकNashik News: व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी चोरडिया यांची निवड

Nashik News: व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी चोरडिया यांची निवड

नाशिक रोड | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच जैन समाजाला न्याय मिळाला असून अशोक चोरडिया यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या इंगळे नगर शाखेच्या सभागृहात सदरची निवड निवडणूक निर्णय अधिकारी इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड संपन्न झाली. बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी गेल्या महिन्यात २५ तारखेला संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली होती. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनल पूर्ण बहुमत मिळविले होते. निवडणूक होण्यापूर्वी गायकवाड व अरिंगळे यांनी जैन समाजाला अध्यक्षपदाचा मान दिला जाईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे प्रथमच यावेळी जैन समाजाला प्रतिनिधित्व देऊन अशोक चोरडिया यांना अध्यक्षपदाचा मान दिला.

- Advertisement -

याप्रसंगी संचालक डॉक्टर प्रशांत भुतडा, जगन आगळे, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, प्रकाश घुगे, अरुण जाधव, सुनील चोपडा, रमेश धोंगडे, सुनील आडके, विलास पेखळे, योगेश नागरे, वसंत अरिंगळे, नितीन खोले, गणेश खर्जुल, रामदास सदाफुले, संचालिका रंजना बोराडे, कमल आढाव, त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश पडवळ, आधी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सिल्व्हर ओकमध्ये खलबतं

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट...