नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निवडणुकांच्या तोंडावर मतदार यादीची आठवण येते. प्रत्यक्षात मतदार यादीतील नावनोंदणी (Voter Registration) अथवा दुरुस्ती ही सातत्याने करता येत असते. नागरिकांना (Citizen) स्वतःच ऑनलाईन प्रणालीद्वारे मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन निवडणूक शाखेने (Election Branch) केले आहे. नागरिकांना आपल्या मतदार नोंदणी अथवा त्यातील पत्ता, फोटो बदलासाठी ऑनलाईन प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी voters. eci.gov.in अथवा voter helpline app च्या मदतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत.
नवीन मतदार नोंदणीत अर्ज करण्यासाठी सूचना
अर्जदार ज्या लोकसभा, विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसाधारण रहिवासी असेल त्या मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकान्याला उद्देशून अर्ज करावा, जर अर्जदारास विधानसभा, लोकसभेचा क्रमांक आणि नाव माहीत नसेल किंवा त्याविषयी शंका असेल तर मतदार नोंदणी अधिकान्याची मदत घ्यावी आणि विधानसभा, लोकसभेचा क्रमांक नमूद केला नाही या कारणांसाठी अर्ज नाकारला जात नाही. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरावयाचा आहे. मतदाराचे फोटो जोडताना फोटो समोरच्या बाजूने संपूर्ण चेहरा दिसेल असा असावा, नजीकच्या काळातील पांढऱ्या पार्श्वभूमीवरील त्यावर सही नसलेले पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र (आकार ४.५ सेंमी. x ३.५ सेंमी.) चिकटवावे. डोळे उघडे असावे आणि चेहऱ्याच्या दोन्ही कानांच्या कड़ा स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत.
सत्यतेच्या पडताळणीसाठी आधार क्रमांक आवश्यक
सत्यतेच्या पडताळणीसाठी आधार क्रमांक नमूद करावा, जर अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल तर ५ (ब) समोरील रकान्यात तसे नमूद करावे. पुरुष स्त्री-तृतीयपंथी याकरता दिलेल्या योग्य चौकटीत लिंग स्पष्टपणे चिन्हांकित कराये, जन्मतारीख अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वप्रमाणित प्रत वयाचा दाखला म्हणून जोडण्यात यावी. अर्जात नमूद केलेला जन्मदाखल्याचा कोणताही दस्ताऐवज उपलब्ध नसल्यास अर्जदाराने वयाचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे आणि अशा कागदपत्राचे नाव अर्जातील ‘घोषणापत्र भागात बाब क्रमांक ७ (ii) आणि (iv) मध्ये नमूद करण्यात यावी. याबाबतीत मतदाराला मतदार नोंदणी अधिकारी किंवा त्याची पडताळणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकान्यासमोर व्यक्तिशः
रहिवासाचे ठिकाण
अर्जदार-पालक-जोडीदार यांच्या नावे असलेला सर्वसाधारण रहिवासी असल्याबाबतचा पुरावा म्हणून अर्जात नमूद असलेल्या कोणत्याही एका कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रतीसह संपूर्ण टपाल पत्ता पिन क्रमांकासहीत नमूद करावा. छपरामध्ये पदपथावर राहणाच्या बेधर भारतीय नागरिक तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांकडे सर्वसाधारण रहिवासाचा कागदपत्र पुरावा नसल्यास, अन्यथा जे नोंदणीसाठी पात्र असल्यास प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल.
यादीतील दुरुस्ती अथवा स्थानांतरण
रहिवासाचे स्थलांतर किंवा नोंदीची दुरुस्ती आणि कोणत्याही सुधारणेशिवाय मतदार ओळखपत्र बदलून देणे यासाठी केलेला अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून मंजूर केला तर अर्जदाराला नवीन मतदार ओळखपत्र पाठवण्यात येईल आणि त्याने आपले जुने मतदार ओळखपत्र हे मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे तत्काळ जमा करणे आवश्यक आहे. अर्जदाराने त्याचे नाव, इपीक क्रमांक, आधार क्रमांक आणि स्वतःचा किंवा नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा. नोंदीच्या प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांक नमूद करावा, जर अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल तर तसे अजर्जात्तील I(b) या ठिकाणी नमूद करावे.
मतदाराचे नाव कमी करण्यासाठी
मतदारसंघाच्या विद्यमान मतदार यादीतील नोंदणीकृत मतदार अर्ज करू शकतो. अर्जदार स्वतः नोंदणीकृत मतदारसंघातील मतदार यादीतील नोंदणीकृत मतदारांबाबत आक्षेप, मतदार यादीच्या नोंदीच्या प्रस्तावित समावेशनाबाबत आक्षेप किंवा अर्जदाराचे स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळण्याची विनंती करण्याबाबत अर्ज करता येईल. अर्जदार त्याचे नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि स्वतःचा किंवा नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक नमूद करावा.
आक्षेपांबाबत काळजी
अर्जदाराने ज्या व्यक्तीविरुद्ध आक्षेप नोंदवला आहे ती व्यक्ती अर्जदाराच्या मते कोणत्या कारणास्तव मतदार यादीमध्ये समावेशनासाठी असणे, भारताचा नागरिक नसणे इ. कारणांपैकी विचारलेल्या कारणांपैकी कोणत्याही एका कारणावर निशाण करणे आवश्यक आहे.
प्रतिज्ञापत्र अर्जासोबत घोषणापत्र
अर्जदाराने ज्या व्यक्तीच्या समावेशाच्या नोंदीबाबत आक्षेप घेतला आहे किंवा वगळण्याची मागणी केली आहे अशा व्यक्तीचे नाव, आडनाव, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र अजनि घोषणापत्राद्वारे है घोषित केले पाहिजे की, नोंदवलेली तध्ये आणि तो त्याच्या समजुतीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर आहेत. या अर्जासंदर्भात घोषाणापत्रात कुठलीही नोंद चुकीची असल्यास किंवा बरोबर नसल्यास त्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार (१९५० चे ४३) दंडाची तरतूद आहे आणि एका वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
मतदार यादीतील नोंदी दुरुस्तीसाठी अर्ज
अर्जदाराला मत्तदार यादीतील कुठलीही विद्यमान नोंद दुरूस्त करायची असेल, त्याने योग्य घौकटीत खूण केली पाहिजे आणि त्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्र सादर केले पाहिजे.
घोषणापत्र
अर्जातील सर्वच नोंदी अनिवार्यपणे पूर्ण कराव्यात. या अर्जासंदर्भात घोषणापत्रातील कुठलीही नोंद चुकीची आढळल्यास किंवा बरोबर नसल्यास त्यासाठी लोकाप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार (१९५० चे ४३) दंडाची तरतूद आहे आणि एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात कृपया याची नोंद घेणे.