Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : बैठकीत साधू-महंतांचे म्हणणे ऐकून घेतले, पालकमंत्री नसले तरी कामे...

Nashik News : बैठकीत साधू-महंतांचे म्हणणे ऐकून घेतले, पालकमंत्री नसले तरी कामे अडणार नाही – CM फडणवीस

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Nashik Collector Office) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Simhastha Kumbh Mela) तारखांबाबत माहिती दिली. तसेच बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंत यांच्यासोबत बैठक झाली. आजच्या बैठकीत १३ आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते. यावेळी सर्व महंतांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन हजार कोटींच्या निविदा आम्ही काढणार आहोत. तसेच जागा अधिग्रहणाबाबत देखील चर्चा झाली आहे. साधू-संतांनी केलेल्या मागणीची दखल घेतली. आजच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. तसेच साधू ग्रामची जागा अधिग्रहण करायची असून, त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले.

पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, “पालकमंत्री नसले तरी कुंभमंत्री आहे आणि बाकीचे मंत्री देखील आहेत. तसेच मी देखील आहे, त्यामुळे पालकमंत्री नसल्यामुळे काही कामे अडणार नाही, असे त्यांनी म्हटले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिंदीमध्ये बाईट देताना त्र्यंबकेश्वर ऐवजी प्रयागराज असा उल्लेख झाला. मात्र, मंत्री महाजन यांनी त्वरित त्यांच्या कानात त्र्यंबकेश्वर-नाशिक असे सांगितल्यावर त्यांनी चुक दुरुस्त केली.

भुजबळ, कोकाटे यांची बैठकीला दांडी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला जिल्ह्यातील चार पैकी केवळ नरहरी झिरवाळ आणि दादा भुसे हे दोनच मंत्री उपस्थित होते. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर  

सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरुवात होणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजता रामकुंडावर ध्वजारोहण करून कुंभमेळा पर्वाला शुभारंभ होईल. तर साधुग्राममध्ये २४ जुलै २०२७ रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तसेच सिंहस्थाची समाप्ती २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. तर नगर प्रदक्षिणा २९ जुलै २०२७ रोजी होईल. तसेच पहिले अमृत स्नान (शाही स्नान) ०२ ऑगस्ट २०२७, दुसरे अमृत स्नान ३१ ऑगस्ट २०२७ आणि तिसरे अमृत स्नान ११ सप्टेंबर २०२७ रोजी होईल. तर २४ जुलै २०२८ रोजी कुंभमेळ्याचे ध्वज अवतरण होणार आहे. तसेच २४ जुलै २०२८ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल.

त्र्यंबकेश्वर अमृतस्नान तारीख

पहिले अमृतस्नान – ०२ -०८-२०२७

द्वितीय अमृतस्नान – ३१-०८ – २०२७

तृतीय अमृतस्नान – १२-०९-२०२७

नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख

पहिले अमृतस्नान –०२ -०८-२०२७

द्वितीय अमृतस्नान – ३१-०८ – २०२७

तृतीय अमृतस्नान – ११-०९-२०२७

 

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...