Thursday, May 2, 2024
Homeनाशिकचव्हाटा पठाणपुरा भागात दोन गटात तुफान दगडफेक; परिसरात तणावपूर्ण शांतता

चव्हाटा पठाणपुरा भागात दोन गटात तुफान दगडफेक; परिसरात तणावपूर्ण शांतता

जुने नाशिक | वार्ताहर 

येथील चव्हाटा पठाणपुरा भागात दोन गटात तुफान दगडफेक होऊन काही गाड्यांची तोडफोड करून नुकसान करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अतिसंवेदनशील परिसर असल्याने घटनास्थळी नाशिक शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांची कुमक दाखल झाली. याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

- Advertisement -

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एक तडीपार सराईत राहतो. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पंचवटी भागातील टोळी सायंकाळी सातच्या सुमारास आली होती.

या टोळीचे सराईताचे घर गाठले मात्र तो हाती लागला नाही. त्यानंतर या टोळीने सराईताच्या गाडीची तोडफोड केली. तसेच परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक होण्यास सुरुवात झाली.

घटनेची माहिती भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांना समजताच पोलिसांच्या कुमकसह त्यांनी काही क्षणात घटनास्थळ गाठले.  पोलिसांचा सुगावा लागल्याने घटनास्थळाहून टोळीतील संशयितांना पोबारा केला. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया भद्रकाली पोलीस ठाण्यात होत असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या