Wednesday, July 29, 2026
HomeनाशिकNashik News : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहकार्याने १३...

Nashik News : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहकार्याने १३ हजार कामगारांना भांडे वाटप – वाघ

निफाड | प्रतिनिधी | Niphad

शहरात भारतीय जनता पक्षाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा संघटित कामगार संघटना जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ (Shankarrao Wagh) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नाशिक यांच्या सहकार्याने गत तीन दिवसात तळागाळातील जवळपास साडेसात हजार कामगारांना व नागरिकांना हजारो किमतीचे घरगुती साहित्य व भांडे वाटप प्रत्येक कामगारास व नागरिकास वाटप करण्यात आल्याचे शंकरराव वाघ यांनी दैनिक देशदूतशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

सरकारी काम व सहा महिने थांब अशी धारणा समाजात शासन कोणतेही असो निर्माण झाली आहे. परंतु कार्य करणारा करणारा नेतृत्व असले की आपण त्या पदाला न्याय देऊ शकतो व आपल्या पदाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा ही उदांत दातृत्वाची भावना ज्या नेतृत्वात असते ते नेतृत्व समाजात पक्षात पुढे जाते या धोरणाला अनुसरूनच शंकरराव वाघ यांनी कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदाला (District President) न्याय देत शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवत त्यांनी १३ हजार घरगुती साहित्य व भांड्यांचे वाटप निफाड शहरात कळवण इगतपुरी त्रंबकेश्वर सुरगाणा व निफाड तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

दरम्यान, यामुळे निफाड (Niphad) उगाव मार्गावरील त्यांच्या कार्यालयाजवळ ही भांडी स्वीकारण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केल्याने येथे यात्रेचे स्वरूप गत तीन-चार दिवसांपासून निर्माण झाले होते. महिलांनी रांगा लावून आपला फॉर्म व आपली ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून त्या महिलेला व नागरिक कामगारांना हा भांड्याचा सेट व घरगुती साहित्य शंकरराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा नेतृत्व गौरव वाघ, शिवम गवळी, रूपाली पराळकर ,वैभव निर्भवणे, कांचन पवार, विठ्ठल गांगुर्डे, पुनम जावरे, अंबादास डेंगळे, अनिता जमधडे, सह कामगार मंडळ कर्मचारी करत परिश्रम घेत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री गिरीश महाजन ,कामगार मंत्री आकाश फुंडकर, कामगार उपायुक्त वि ना .माळी आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील नागरिकांना कामगारांना असंघटित संघटित कामगारांना शासनाची योजना पोचली पाहिजे यासाठी घरगुती साहित्य व भांड्यांचे सट गत काही महिन्यांपासून वाटपाचे कार्य सुरू आहे अद्याप होतो १३ हजार कामगार व नागरिकांना हे सेट वाटप करण्यात आले आहे. पुढील काळात मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत पाच हजार कामगार व नागरिकाना एकाच वेळी एकाच कार्यक्रमात भांडे साहित्य वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे.

शंकरराव वाघ, जिल्हाध्यक्ष, संघटित कामगार

ताज्या बातम्या

एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी मुदतवाढ

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ...