Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापणार - डॉ. गेडाम

Nashik News : कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापणार – डॉ. गेडाम

राज्य शासनास प्रस्ताव सादर करणार

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) २०२७ च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखडासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदन्न शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

कुभमेळा करण्यासाठी ४० जणांची टीम नियुक्त करावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने नियोजन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) दर्जाचा अधिकारी नेमणे गरजेचे आहे. त्यासोबतच पोलीस उपायुक्त, नियोजन अधिकारी, आर्थिक ताळेबंद सांभाळण्यासाठी लेखा अधिकारी, विकासकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी अभियंता दर्जाचा क्वालिटी कंट्रोल अधिकारी, विविध प्रसार माध्यमांशी संवाद साधणे व माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मीडिया कक्ष आदींसह कार्यालयीन कामकाजासाठीचे कर्मचारी, अधिकारी अशी सुमारे ४० जणांची टीम बनवावी लागणार असल्याने त्याबाबतचा अहवाल नगरविकास व मुख्यमंत्री कक्षापर्यंत परवानगीसाठी पाठवला जाणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने कुंभमेळा कक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. रामकालपथसाठी सल्लागारांशी चर्चा करून अंतिम निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या महामार्ग येथे कुंभमेळा काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोबाईल डाटा वापर वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करून कुंभमेळा कालावधीत इंटरनेट सेवा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने जादा टॉवर उभारावे, इंटरनेट डाटा क्षमता वाढविण्याबाबत चर्चा करून नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. शहरात सिंहस्थासाठी येणाऱ्या संत महंतांच्या निवाऱ्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधुग्रामला प्राथमिकता देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, याबाबत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने कुंभमेळा कक्ष (Kumbh Mela Hall) स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे विभागीय महसूल आयोग आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत रेल्वे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यावेळी ओढा, नाशिकरोड व देवळाली या तीनही रेल्वे स्टेशनचा विकास करुन ठिकाणी विशेष व्यवसाय करण्याचे सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अंदाजपत्रक तयार करा

सिंहस्थ कुंभमेळासाठी विविध विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावात नमूद कामांपैकी ज्या कामांसाठी दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे, ती कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश देतानाच अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.

लोगोसाठी स्पर्धा

सिंहस्थसाठी लोगो तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. मात्र, याबाबतची शहरातील गुणवंतांच्या स्पर्धा ठेवण्याच्या दृष्टीने आवाहन करण्याची सूचना देण्यात आली.

३० हजार ई-टॉयलेट

शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रसाधनासाठी ई-टॉयलेटवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाविकांची संख्या लक्षात घेता सुमारे ३०,००० टॉयलेटची गरज लागण्याची शक्यता असून, ते स्वतः उभारावे की भाडेतत्वावर घ्याचे याबाबत सखोल आढावा सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रयागराजला अग्निशमनचा ‘क्विक रिस्पॉन्स’

प्रयागराज येथे लागलेल्या भीषण आगीप्रसंगी अवघ्या ३ मिनिटात अग्निशमन दल दाखल झाले होते. त्यांचा हा ङ्गक्निक रिस्पॉन्सफ कौतुकास्पद आहे. त्याच पर्श्वभूमीवर तपोवन व त्र्यंबकेश्वरात आपत्कालीन मदतीचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन करुन आढावा सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...