Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik News : ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार; शेतकऱ्यांची...

Nashik News : ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार; शेतकऱ्यांची हेळसांड

ओझे l वार्ताहर | Oze

आदिवासी विकास महामंडळाकडून खरीप पणन हंगाम २०२५-२६ किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी (Farmer) नोंदणीस शासनाकडून ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली असली तरी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिका-यांनी आपल्या विविध मागण्यासाठी १५ डिसेंबर पासून ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे.

- Advertisement -

त्यामुळे ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही सातबारा (Satbara) उतारे हे महा ई सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर निघतात तर काही सातबारा उतारे हे तलाठी यांचेकडेच निघतात. त्यामुळे ईसेवा केंद्रात निवडलेल्या सातबा-याची डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया तलाठी कार्यालय सुरू असल्याचा संदेश येत आहे.

दरम्यान, महा ई सेवा केंद्रात सातबारा उतारा काढता येत नाही व तलाठ्यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला असल्याने शेतकरी वर्गाची नवीन सातबारा उताऱ्यामुळे हेळसांड होत आहे. शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेचा लाभ मिळतो कि काय? कारण तलाठ्यांचा ऑनलाईन कामावर बेमुदत बहिष्कार असल्याने शेतकरी वर्गाची मोठी तारांबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....