Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik News : येवल्यात दुकानाला आग; लाखोंची वित्तहानी

Nashik News : येवल्यात दुकानाला आग; लाखोंची वित्तहानी

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) व्यापारी संकुलातील एका हार्डवेअर दुकानाला आग (Fire) लागून लाखोंची वित्तहानी झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नगर-मनमाड महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असणाऱ्या व्यापारी संकुलातील साईप्रसाद इरिगेशन या हार्डवेअर दुकानाला (Shop) अकस्मात आग लागली. दुकान बंद असल्याने या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सदर घटना रविवारी, (दि. १८) सायंकाळच्या सुमारास घडली.

दरम्यान, नगरपालिकेचा (Municipality) अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची चर्चा असून, व्यवसायिकाचे (Businessmen) लाखोंचे नुकसान (Damge) झाल्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के मतदान;...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदानास (Voting) प्रारंभ झाला होता....